मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आज एल्गार पुकारणार आहेत. महाविकास आघाडी आणि मनसे आज मुंबईत आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहे. सत्याचा मोर्चा असं या मोर्चाचं नामकरण करण्यात आलंय. या मोर्चाला उद्धव ठाकरे , राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे उपस्थित असणार आहेत. आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबत हा मोर्चा काढण्यात येत आहे. लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर यावं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह जात राज ठाकरेंनी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं. मात्र निवदेनं देऊन काही उपयोग नसल्याने हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं मविआ आणि मनसेने सांगितलं आहे.

विरोधकांच्या मागण्या काय आहेत?

१) महापालिका निवडणुकांच्या आधी मतदार याद्या अद्ययावत करा, त्यात कुठलीही चूक नको

२) मतदार याद्या अद्ययावत होईपर्यंत निवडणुका घेऊ नका, त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला तरीही चालेल.

३) मतदार याद्यांमधली दुबार नावं काढा

४) ७ नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा

या चार प्रमुख मागण्या राज ठाकरेंच्या मनसेने आणि महाविकास आघाडीने केल्या आहेत. सत्याचा मोर्चा याच मागण्यांसाठी काढला जाणार आहे. राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमध्ये घोळ घातल्याचा आरोप केला होता. निवडणूक आयोग आणि भाजपा यांचं साटंलोटं असल्याचंही म्हटलं होतं. आता राज्यातही महाविकास आघाडी आणि मनसेने मतदार याद्यांचे घोळ आहेत असा आरोप केला आहे. मोर्चात आणखी काय होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मोर्चाचा मार्ग नेमका कसा असेल?

दुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान मुंबईतील फॅशन स्ट्रीट या भागातून मोर्चा सुरु होईल.

फॅशन स्ट्रीटकडून मोर्चा मेट्रो सिनेमाच्या चौकात आणि त्यानंतर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या दिशेने जाईल

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाजवळ स्टेज उभारण्यात आलं आहे. त्या ठिकाणी मविआच्या नेत्यांची भाषणं होतील. राज ठाकरेंचंही भाषण होईल.

उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषणं होण्याची शक्यता आहे.

मोर्चाला कोणते प्रमुख नेते उपस्थित राहतील?

शरद पवार, राष्ट्रवादी(शरद पवार)
उद्धव ठाकरे, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)
राज ठाकरे, मनसे
विजय वडेट्टीवार,काँग्रेस
बाळासाहेब थोरात,काँग्रेस
सुप्रिया सुळे,राष्ट्रवादी
जितेंद्र आव्हाड,राष्ट्रवादी
जयंत पाटील,राष्ट्रवादी
रोहित पवार,राष्ट्रवादी
शशिकांत शिंदे,राष्ट्रवादी
आदित्य ठाकरे,शिवसेना
बाळा नांदगावकर, मनसे
जयंत पाटील, शेकाप
प्रकाश रेड्डी, भाकप
अनिल परब,शिवसेना
अनिल देसाई, शिवसेना
अरविंद सावंत, शिवसेना
राजन विचारे , शिवसेना
सचिन अहिर , शिवसेना
अंबादास दानवे, शिवसेना
सुनील प्रभू, शिवसेना
सुनील शिंदे, शिवसेना
अविनाश अभ्यंकर, मनसे
नितीन सरदेसाई, मनसे
संदीप देशपांडे, मनसे
अविनाश जाधव,मनसे
नसीम खान, काँग्रेस<br>सचिन सावंत, काँग्रेस
अमीन पटेल, काँग्रेस