Sharad Pawar And Devendra Fadnavis : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमबाबत संपूर्ण राज्यात उलट सुलट चर्चा सुरू आहे. अशात राष्ट्रवादीचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करताना म्हटले होते की, काँग्रेस पक्षाला ८० लाख मते पडूनही त्यांचे फक्त १६ आमदार विजयी झाले. शिवसेनेला (एकनाथ शिंदे) ७९ लाख मते मिळाली आहेत आणि ५७ आमदार निवडून आले आहेत. म्हणजे एक लाख कमी मतदान मिळूनही जवळपास ४१ आमदार अधिक निवडून आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार यांच्या विधानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत उत्तर दिले होते. यावेळी फडणवीसांनी, “पवार साहेब आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका,” असे म्हणत मतांचे गणित सांगितले होते. यावर आता शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना मारकडवाडीच्या ग्रामस्थांसमोर, “मी काय चुकीचे केले?” असा प्रश्न केला आहे. ईव्हीएम विरोधात आंदोलन उभे करणाऱ्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावाला भेट देत पवारांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकूण घेतले.

हे ही वाचा : विरोधी पक्षांच्या आमदारांनी जर उद्या शपथ घेतली नाही तर काय होणार? भुजबळ म्हणाले…

काय म्हणाले शरद पवार?

ईव्हीएम विरोधात आंदोनल उभारणाऱ्या मारकडवाडीच्या ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी आज राष्ट्रवादीने (शरद पवार) कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शरद पवार म्हणाले, “आज जगात कुठेही ईव्हीएमचा वापर होत नाही. मग भारताच याचा वापर का सुरू आहे. आज तुमच्या गावाने एका वेगळ्या पद्धतीने जायचे ठरवले तर सरकाने तुमच्याविरोधात खटला भरला. माझी तुम्हाला विनंती आहे की, तुमच्यावर दाखल करण्यात आलेल्या खटल्याची सर्व माहिती मला द्या. याबाबतची तक्रार आम्ही राज्याचा निवडणूक आयोग, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे देऊ. हे कशासाठी? तर निवडणूक यंत्रणांचा काळा सोकू नये म्हणून. “

हे ही वाचा : “राम सातपुते फडणवीसांचं डबडं, ते वाजतच राहणार”, मारकडवाडी प्रकरणावरून उत्तम जानकरांची…

फडणवीसांना सवाल

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “मी निवडणुकीच्या निकालावर भाष्य केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, पवार साहेबांनी हे करणे योग्य नाही. मी काय चुकीची गोष्ट केली? तुमच्या गावी येणे, तुमचे म्हणणे ऐकून घेणे चुकीचे आहे? लोकांच्या मनात काही शंका आहेत. त्याबद्दल जाणून घेणे, त्याचे निरसन करणे चुकीच आहे का?”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar cm devendra fadnavis evm markadwadi evm aam