क्रिती सेनॉन होणार प्रभासची बायको? त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत म्हणाली... | Kriti sanon expressed his views about dating rumours with prabhas | Loksatta

क्रिती सेनॉन होणार प्रभासची बायको? त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत म्हणाली…

प्रभास आणि क्रिती ही दोघं एकमेकांना डेट करत आहेत अशा गेले अनेक दिवस चर्चा रंगल्या आहेत.

क्रिती सेनॉन होणार प्रभासची बायको? त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत म्हणाली…
bollywood actor and actress

प्रभास आणि क्रिती सेनॉन सध्या ‘आदिपुरुष’ या पॅन-इंडियन चित्रपटात एकत्र काम करत आहेत. या चित्रपटापासून हे जोडपं सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. ही दोघं एकमेकांना डेट करत आहेत असंही बोललं जात होतं. ‘आदिपुरुष’च्या टीझर लॉन्चच्या वेळी त्यांची केमिस्ट्री आणि त्यांच्यातला बाँड पाहून ते खरोखर एकमेकांना डेट करत आहेत असंच त्यांच्या चाहत्यांना वाटलं. पण आता क्रितीच्या एका वाक्याने सर्वांचं लक्ष त्यांच्या नात्याकडे वेधलं गेलं आहे.

क्रिती सेनॉन आणि वरुण धवन यांचा ‘भेडिया’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. क्रिती सेनॉन गेले काही दिवस त्यांच्या ‘भेडिया’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त होती. विविध शहरांमध्ये, कार्यक्रमांमध्ये उपास्थिती लावत त्यांनी या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं. यादरम्यानची त्यांची एक मुलाखत सध्या खूप व्हायरल होत आहे. यात तिने प्रभासशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हेही वाचा : “माझ्या आईकडून मिळालेला वारसा….” ; प्रतीक बब्बरने स्मिता पाटील यांच्याशी होणाऱ्या तुलनेबद्दल केलं भाष्य

क्रितीच्या ‘भेडिया’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीची एक छोटीशी क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या मुलाखतीत तिने तिचा ‘आदिपुरुष’मधील सहकलाकर प्रभासशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. क्रिती म्हणाली की, “जर मला संधी मिळाली तर मी प्रभासशी लग्न करेन.” त्यासोबतच ‘आदिपुरुष’च्या शूटिंगच्या वेळी प्रभास क्रितीचा तेलुगूचा शिक्षक बनला होता असंही क्रितीने सांगितलं. आता क्रितीच्या या वाक्याने सर्वजण आवाक् झाले असून तिचं हे विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे. क्रितीच्या या बोलण्याने आता पुन्हा एकदा प्रभास आणि क्रिती सेनन ट्विटरवर ट्रेंड करत आहेत. त्यामुळे आता ती दोघं खरोखर एकमेकांना डेट करत आहेत असं त्यांच्या चाहत्यांना वाटू लागलं आहे.

आणखी वाचा : “पौराणिक व्यक्तिरेखांचा त्यांना…”; क्रिती सेनॉनचे ओम राऊतबद्दल मोठे वक्तव्य

प्रभास आणि क्रिती सेनॉन यांचा ‘आदिपुरुष’ हा बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. यात या दोघांव्यतिरिक्त सैफ अली खान आणि सनी सिंग यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा ओम राऊत याने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट १६ जून २०१३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 09:34 IST
Next Story
Video : भिंतीचा आधार घेत पार्टीतून बाहेर पडली सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी; नेटकरी म्हणाले, “धड चालताही…”