बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या ‘सेल्फी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. २४ फेब्रुवारीला ‘सेल्फी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमार त्याची जादू दाखवू शकलेला नाही. चित्रपटगृहापर्यंत प्रेक्षकांना खेचून आणण्यात सेल्फी अपयशी ठरत आहे. पहिल्या चार दिवसांत चित्रपटाने केवळ ११.९ कोटींची कमाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॉमेडी ड्रामा असलेल्या अक्षय कुमारच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. २०२३ या नववर्षातील खिलाडी कुमारचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही अक्षयच्या या चित्रपटाकडून अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा उतरला नसल्याचं चित्र आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी २.६ कोटींची कमाई केली होती. शनिवारी चित्रपटाने ३.७५ कोटी आसपास तर रविवारी ३.९० कोटींचा गल्ला जमवला. तर चौथ्या दिवशी फक्त १.६ कोटींची कमाई केली आहे.

हेही वाचा>> “अश्लील व्हिडीओ असलेले आदिलचे फोन पोलिसांनी…” राखी सावंतचे गंभीर आरोप

हेही वाचा>> घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान राजीव सेनने पत्नी चारू असोपाच्या वाढदिवशी शेअर केले रोमँटिक फोटो, नेटकरी म्हणाले “लग्नाला खेळ…”

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला अक्षय कुमारचा हा सलग पाचवा चित्रपट आहे. याआधी अक्षयचे ‘राम सेतू’, ‘रक्षाबंधन’, ‘बच्चन पांडे’ व ‘सम्राट पृथ्वीराज’ हे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फार चांगली कमाई करू शकलेले नाहीत. परंतु, अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ या यादीत पहिल्या नंबरवर आहे. त्यामुळे अक्षय कुमारचा सेल्फी बॉक्स ऑफिसवर सपशेल फेल ठरला आहे.

हेही वाचा>> Video: “१० वाजता कोणता योगा असतो”, ‘त्या’ व्हिडीओमुळे प्राजक्ता माळी ट्रोल, नेटकरी म्हणाले “विना मेकअपची दारू…”

अक्षय कुमारच्या ‘सेल्फी’ चित्रपटात अभिनेता इमरान हाश्मीही मुख्य भूमिकेत आहे. ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ या मल्याळम चित्रपटाचा हा रिमेक आहे. राज मेहता यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. १५० कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाला अपेक्षेपेक्षा फारच कमी यश बॉक्स ऑफिसवर मिळालं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selfiee box office collection day 4 akshay kumar imaran hashmi movie flop kak