scorecardresearch

Video: “१० वाजता कोणता योगा असतो”, ‘त्या’ व्हिडीओमुळे प्राजक्ता माळी ट्रोल, नेटकरी म्हणाले “विना मेकअपची दारू…”

योगा व्हिडीओ शेअर केल्याने प्राजक्ता माळी ट्रोल

prajakta mali troll
प्राजक्ता माळी ट्रोल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच मनोरंजन विश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अभिनयाप्रमाणेच ती एक उत्तम नृत्यांगणाही आहे. प्राजक्ता तिच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसते.

फिटनेस कायम ठेवण्यासाठी प्राजक्ता योगा करते. अनेकदा ती योगा करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांनाही त्याचं महत्त्व पटवून देत असते. प्राजक्ताने नुकताच योगा करतानाचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. परंतु, या व्हिडीओमुळे प्राजक्ताला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. प्राजक्ताच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. प्राजक्ताने व्हिडीओची सुरुवात इंग्रजीमधून केल्याचं तिच्या चाहत्यांना खटकल्याचं दिसत आहे.

हेही वाचा>> “आलियाने खूप सहन केलं आहे” नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावाचं वक्तव्य, म्हणाला “त्याचा मुलगा अनैतिक…”

एकाने कमेंट करत “मराठी बोला असं सगळ्यांना सांगता आणि तुम्ही काय करता मग” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “सुरुवात मराठीत केली असती तर खूप छान वाटलं असतं”, अशी कमेंट केली आहे. आणखी एका नेटकऱ्याने “मॅडम, मराठीमधून बोला नाहीतर तुम्हाला कोणी बघणार नाही” असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. “१० वाजता कोणता योगा असतो, सूर्य डोक्यावर आला” असंही एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने “१ तास ४० मिनिटांचा व्हिडीओ आम्ही बघावा अशी अपेक्षा आहे का तुमची” अशी कमेंट केली आहे. “विना मेकअपची दारू प्यायल्यासारखी वाटत आहे”, असं म्हणत नेटकऱ्यांनी प्राजक्ताला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा>> “दो कौड़ी की औरत” प्रियांका गांधींच्या PAवर ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप, म्हणाली “त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष…”

‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोचं ती सध्या सूत्रसंचालन करत आहे. प्राजक्ताने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे. ‘रानबाझार’ या वेब सीरिजमधील तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 13:46 IST