scorecardresearch

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान राजीव सेनने पत्नी चारू असोपाच्या वाढदिवशी शेअर केले रोमँटिक फोटो, नेटकरी म्हणाले “लग्नाला खेळ…”

राजीव सेन व चारू असोपाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

rajeev sen charu asopa
राजीव सेन व चारू असोपा ट्रोल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन व त्याची पत्नी चारू असोपा त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत होते. राजीव व चारू यांच्यात बिनसल्यामुळे वादाची ठिणगी पडली होती. ते दोघे घटस्फोट घेणार असल्याच्याही चर्चा होत्या. चारू असोपाने पतीवर अनेक गंभीर आरोपही केले होते. परंतु, आता चारूच्या वाढदिवसाला राजीवने तिच्याबरोबरचे फोटो शेअर केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राजीवने पत्नी चारूच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट लिहिली आहे. पत्नी व मुलीबरोबरचा फोटो शेअर करत राजीवने चारूला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चारू…खूप सारं प्रेम…तुला चांगलं आरोग्य लाभो” असं म्हणत राजीवने कॅप्शनमध्ये हार्ट इमोजीही पोस्ट केले आहेत. राजीवने केलेल्या पोस्टमुळे चाहते संभ्रमात आहेत.चारूनेही राजीवबरोबरचे हे फोटो शेअर करत त्याचे आभार मानले आहेत. “माझा वाढदिवस स्पेशल बनवल्याबद्दल थँक्यू” असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. राजीव सेन व चारू असोपाच्या या पोस्टनंतर यांचं नक्की काय चाललं आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. अनेकांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत राजीव व चारूला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा>> Video: “१० वाजता कोणता योगा असतो”, ‘त्या’ व्हिडीओमुळे प्राजक्ता माळी ट्रोल, नेटकरी म्हणाले “विना मेकअपची दारू…”

एकाने कमेंट करत “या दोघांचं नक्की काय चाललं आहे? घटस्फोट घेणार होते…आणि आता तर एकत्र दिसत आहेत” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “कधी घटस्फोट घेतात, तर कधी एकत्र दिसतात…लग्नाला खेळ समजलं आहे”, अशी कमेंट केली आहे. “आता दहा दिवसांनंतर हे दोघेही पुन्हा फोटो डिलीट करुन टाकतील” अशी कमेंट एकाने केली आहे. “हे दोघेही ड्रामा कंपनी आहेत. सेलिब्रिटीवर आता विश्वासच राहिलेला नाही” असंही युजरने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> “दो कौड़ी की औरत” प्रियांका गांधींच्या PAवर ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप, म्हणाली “त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष…”

हेही वाचा>> “आलियाने खूप सहन केलं आहे” नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावाचं वक्तव्य, म्हणाला “त्याचा मुलगा अनैतिक…”

दरम्यान, चारू असोपा व राजीव सेन १६ जून २०१९ रोजी विवाहबंधनात अडकले होते. परंतु, लग्नाच्या तीन वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. जून २०२३ मध्ये ते औपचारिकरित्या वेगळे होणार असल्याची माहिती आहे. त्यांना जियाना ही मुलगी असून घटस्फोटानंतर ती चारूबरोबर राहणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 15:44 IST
ताज्या बातम्या