अभिनेत्री राखी सावंतच्या संसारात वादळ आलं आहे. आदिलचं अफेअर असल्याचा खुलासा केल्यानंतर राखीने त्याच्याविरोधात तक्रार केली होती. ओशिवरा पोलिसांनी त्याला ७ फेब्रुवारीला अटक केल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. १६ फेब्रुवारीला आदिलची रवानगी चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत करण्यात आली होती. आदिलवर म्हैसूरमध्ये इराणी महिलेकडून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता त्याची म्हैसूर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नुकतंच लाइव्ह केलं होतं. या लाउव्हमधून तिने आदिलसह मुंबई पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत.”आदिलचे फोन मुंबई पोलिसांनी शोधले नाहीत. त्यांनी त्याची चौकशीही केली नाही. त्याने काय जादू केली मला माहीत नाही. पण ओशिवारा पोलिसांनी काहीच केलं नाही. माझ्यासारख्या सेलिब्रिटीला तुम्ही न्याय मिळवून दिला नाही तर सामान्य माणसांना काय न्याय मिळणार? आदिलच्या फोनमध्ये माझे व इतर अनेक मुलींचे अश्लील व्हिडीओ आहेत. ओशिवारा पोलिसांनी त्याचे फोन शोधले नाहीत. पण मला विश्वास आहे, की आता देवच त्याचे फोन शोधायला मदत करेल. आदिलचे फोन मिळाले नाहीत तर तो आमचे व्हिडीओ व्हायरल करेल. ओशिवारा पोलिसांनी त्याला सोडून दिलं. पण म्हैसूर पोलिसांवर माझा विश्वास आहे”, असं राखी म्हणाली आहे.

The criminal was arrest by the police officer despite being injured nashik
जखमी होऊनही पोलीस अधिकाऱ्याकडून गुन्हेगार ताब्यात
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Delhi Police
Delhi Police : धक्कादायक! पोलीस कॉन्स्टेबलला गाडीखाली चिरडलं; आरोपी फरार, कुठे घडली घटना?
Raid in Hookah Parlor Kondhwa,
कोंढव्यात मॅश हॉटेलमधील हुक्का पार्लरवर छापा
drones, girgaon chowpatty, missing children girgaon,
गिरगाव चौपाटीवर ड्रोन उडवणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा, हरवलेली ३९ मुले कुटुंबियांकडे सुपूर्द
Who is IPS Shivdeep Lande why he is resign
IPS Shivdeep Lande Resign: कोण आहेत IPS शिवदीप लांडे? बिहारच्या गुंडांना घाम फोडणाऱ्या मराठी अधिकाऱ्याने अचानक राजीनामा का दिला?
Swati Maliwal attacks Atishi brings Afzal Guru angle
Swati Maliwal attacks Atishi: ‘आतिशीच्या कुटुंबाने अफझल गुरूची फाशी रोखण्याची विनंती केली’, स्वाती मालिवाल यांचे टीकास्र
Kolkata hospital rape
Kolkata Rape Case : कोलकात्यातील रुग्णालयात आजारी मुलाच्या आईचा विनयभंग, वॉर्डबॉयने झोपलेल्या महिलेला पाहून…

हेही वाचा>> “तुझ्याशी लग्न करेन, गुन्हा मागे घे” राखी सावंतचे पती आदिल खानवर पुन्हा आरोप, म्हणाली “त्याने बलात्काराचा आरोप केलेल्या इराणी महिलेला…”

हेही वाचा>> Video: “१० वाजता कोणता योगा असतो”, ‘त्या’ व्हिडीओमुळे प्राजक्ता माळी ट्रोल, नेटकरी म्हणाले “विना मेकअपची दारू…”

पुढे राखी म्हणाली, “आदिलवर इराणी महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. म्हैसूरमध्ये त्या महिलेला बोलवून आदिलने मी राखीला घटस्फोट देणार आहे असं सांगितलं. तुझ्याशी लग्न करेन, केस मागे घे असंही आदिल तिला म्हणाला. मलाही ओशिवारा पोलीस ठाण्यात बोलवून सगळ्यांना सोडून फक्त तुझ्याशी संसार करणार असल्याचं आदिलने मला सांगितलं. आदिल तू प्रत्येक मुलीला फसवणं बंद कर.मी तुला घटस्फोट देणार नाही. त्यामुळे तू कोणाशीही लग्न करू शकणार नाहीस. तू माझ्याबरोबर फक्त निकाह नाही तर कोर्ट मॅरेजही केलं आहेस. त्यामुळे तू लग्न केलंस…तर मी तुझ्याविरोधात गुन्हा दाखल करेन”.

हेही वाचा>> “आलियाने खूप सहन केलं आहे” नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावाचं वक्तव्य, म्हणाला “त्याचा मुलगा अनैतिक…”

“आदिल तू शारीरिक व मानसिक त्रास दिला आहेस. मी रोज सकाळी उठून नमाज पठण करते. कारण तू मला मुस्लीम धर्माचा स्वीकार करायला सांगितला. आदिल तू वाईट आहेस, पण मुस्लीम धर्म चुकीचा नाही. आता मला अल्लाहच ताकद देईल. मी रोज उठून सगळ्या देवांची प्रार्थना करते. त्यातूनच मला हिंमत मिळते”, असंही राखी म्हणाली आहे. राखीने आदिलविरोधात तक्रार केल्यानंतर ओशिवारा पोलिसांनी त्याला ७ फेब्रुवारीला अटक केली होती. त्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. १६ फेब्रुवारीला आदिलची रवानगी चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत करण्यात आली होती. आदिलवर म्हैसूरमध्ये इराणी महिलेकडून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता त्याची म्हैसूर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.