अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या मराठमोळ्या अंदाजासाठी नेहमीच ओळखली जाते. वेशभूषा असो नाहीतर खाद्यपदार्थ; तिला मराठी संस्कृतीबद्दल खूप प्रेम आहे. आता नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत ज्यात ती मिसळ आणि वडापावचा आस्वाद घेताना दिसतेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रद्धा कपूर श्रद्धा तिच्या आगामी ‘तू झुठी मै मक्कार’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. सध्या ती या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. याच निमित्त काल ती पुण्यात आली होती. पुण्यातील एका कॉलेजमधील विद्यार्थ्यांबरोबर तिने तिचा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला. तर या दौऱ्यादरम्यान ती मिसळ आणि वडापावचाही आस्वाद घेताना दिसली.

आणखी वाचा : पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यावर प्रतीक बब्बर ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात, नातं जगजाहीर करत म्हणाला…

श्रद्धा पुण्यात आल्याचा कळताच तेथील चाहत्यांनी तिच्या गाडीभोवती घोळका केला. तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते खूप प्रयत्न करत होते. चाहत्यांची गर्दी इतकी जमली की तिच्या गाडीला वाट काढणंही कठीण झालं होतं. अखेर श्रद्धा तिला पोहोचायचं असलेल्या ठिकाणी पोहोचली आणि चित्रपटाचं प्रमोशन केलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर त्यानंतर श्रद्धाने पुण्यातील प्रसिद्ध मिसळीचा आस्वाद घेतला. त्याचबरोबर तिने पुण्यात गेल्यावर वडापावही खाल्ला. वडापाव खातानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत तिने लिहिलं, “आयुष्यभरासाठीचा माझा व्हॅलेंटाईन…”

हेही वाचा : श्रद्धा कपूर विनामेकअप दिसते ‘अशी’, अभिनेत्रीला पाहून सर्वजण आश्चर्यचकित

आता श्रद्धाचे हे फोटो आणि तिचा पुणे दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. यादरम्यान तिच्या साधेपणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तर त्याचबरोबर तिच्या नम्रपणाचंही सर्वजण कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha kapoor had misal and vadapav when she visited pune yesterday rnv