६ फेब्रुवारी नाही तर 'या' दिवशी सिद्धार्थ-कियारा बोहल्यावर चढणार, लग्नाबाबत मोठी अपडेट समोर | Siddharth malhotra kiara advani will be getting married on 7 february | Loksatta

६ फेब्रुवारी नाही तर ‘या’ दिवशी सिद्धार्थ-कियारा बोहल्यावर चढणार, लग्नाबाबत समोर आली मोठी अपडेट

६ फेब्रुवारी रोजी लग्न करतील असं बोललं जात होतं. मात्र आता त्यांच्या लग्नाची तारीख वेगळीच असल्याचं समोर आलं आहे.

sid kiara
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

बॉलिवूडमधील लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडपं कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा विवाह बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहेत. गेले अनेक महिने ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांच्या लग्नामुळे त्यांचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत. त्यांच्या लग्नसमारंभाचे फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुर झाले आहेत. ६ फेब्रुवारी रोजी लग्न करतील असं आतापर्यंत बोललं जात होतं. मात्र आता त्यांच्या लग्नाची तारीख वेगळीच असल्याचं समोर आलं आहे.

सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर पार पडणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी अडवाणी आणि मल्होत्रा कुटुंबीय नुकतेच जैसलमेरला रवाना झाले. आजपासून यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. त्यांच्या लग्नाचा मेहंदी समारंभ आज रंगणार आहे. उद्याही दोघ विवाह बंधनात अडकतील असं बोललं जात होतं, परंतु उद्या ते विवाहबद्ध होणार नाहीत.

आणखी वाचा : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीला रद्द करावा लागला हनिमून, ‘हे’ आहे कारण

रिपोर्ट्सनुसार सिद्धार्थ आणि कियाराचा मेहंदी समारंभ आज संध्याकाळी रंगणार आहे. तर उद्या सकाळी त्यांचा हळदी समारंभ पार पडेल. उद्या संध्याकाळी त्यांचं संगीत होईल आणि परवा म्हणजेच ७ फेब्रुवारी रोजी ही दोघं बोहल्यावर चढतील. त्यामुळे ही दोघं उद्या नाही तर परवा विवाहबद्ध होत आहेत.

हेही वाचा : ‘शेरशाह’च्या सेटवर नाही तर ‘या’ कारणाने झाली होती सिद्धार्थ-कियाराची पहिली भेट, नंतर ‘अशी’ सुरु झाली लव्हस्टोरी

सिद्धार्थ आणि कियारा चा लग्न सोहळा शाही थाटात रंगणार आहे. या लग्नासाठी १०० ते १२५ लोकांना निमंत्रण दिलं गेलं आहे. या विवाह सोहळ्याला त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराबरोबरच बॉलिवूडमधील दिग्गज स्टार्स नाही आमंत्रित केलं गेलं आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, वरुण धवन यांबरोबरच अनेक आघाडीचे कलाकार यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावतील.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 18:32 IST
Next Story
सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीला रद्द करावा लागला हनिमून, ‘हे’ आहे कारण