scorecardresearch

सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीला रद्द करावा लागला हनिमून, ‘हे’ आहे कारण

उद्या ही दोघं विवाह बंधनात अडकणार आहेत.

sid kiara

बॉलिवूडमधील लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडपं कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा अखेर उद्या विवाह बंधनात अडकणार आहेत. गेले अनेक महिने ते रिलेशनशिप मध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांच्या लग्नामुळे त्यांचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत. त्यांच्या लग्नाबाबत अपडेट्स समोर येत असतानाच लग्नानंतर ही दोघं हनिमूनला कुठे जाणार याच्याही चर्चा रंगत आहेत. पण आता याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर पार पडणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी अडवाणी आणि मल्होत्रा कुटुंबीय नुकतेच जैसलमेरला रवाना झाले. आजपासून यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. तर उद्या ही दोघं लग्नगाठ बांधतील. पण लग्ननंतर ते हनिमूनला जाणार नाहीयेत. यामागेही मोठं कारण दडलं आहे.

आणखी वाचा : ‘शेरशाह’च्या सेटवर नाही तर ‘या’ कारणाने झाली होती सिद्धार्थ-कियाराची पहिली भेट, नंतर ‘अशी’ सुरु झाली लव्हस्टोरी

लग्नानंतर सिद्धार्थ आणि कियारा यांनी देखील हनिमूनला जाण्याचा विचार केला होता. मात्र आता त्यांना तो प्लॅन सध्या पुरता रद्द करावा लागत आहे. ते लग्नानंतर हनिमूनला जाणार नसल्यास बोललं जात आहे. रिपोर्ट्सनुसार सिद्धार्थ आणि कियारा आपापल्या कामांमध्ये व्यग्र आहेत. त्यांनी निर्मात्यांना दिलेल्या कमिटमेंट्समुळे सध्या त्यांना हनिमूनला जाणं शक्य होत नाहीये.

हेही वाचा : गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्ने अभिषेक बच्चनची एकदा नव्हे तर दोनदा घेतली दखल; कारण वाचून व्हाल थक्क

सिद्धार्थ मल्होत्रा सध्या रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सिरीजमुळे चर्चेत आहे. सध्या तो या सिरीजच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तर दुसरीकडे कियारा लवकरच कार्तिक आर्यनबरोबर ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्यामुळे हे कपल आता सध्या हनिमूनला जाऊ शकत नाहीये.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 17:50 IST