मुंबई : मध्य रेल्वेच्या शीव आणि भायखळा स्थानकावर पादचारी पुलाच्या तुळया बसवण्यासाठी दोन विशेष ब्लॉक घेण्यात आले आहेत. शनिवारी रात्रकालीन हे ब्लॉक असतील. या ब्लॉकमुळे उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत होईल.
भायखळा स्थानकावर पादचारी पुलाचे ४ स्टील गर्डर्स बसवण्यासाठी ११० मेट्रिक टन रोड क्रेन वापरून आणि शीव उड्डाणपुलाजवळ पादचारी पुलाचा ४० मीटर स्पॅन बसवण्यासाठी २५० मेट्रिक टन रोड क्रेन वापरून दोन विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आले आहेत.
ब्लॉक पहिला
ब्लॉकची तारीख – शनिवार रात्रकालीन ब्लॉक
ब्लॉकची वेळ – शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ४.३० पर्यंत
वाहतूक ब्लॉक विभाग – भायखळा ते परळ दरम्यान अप व डाऊन धिम्या व जलद मार्गावर
ब्लॉक दुसरा
ब्लॉकची तारीख – शनिवार रात्रकालीन ब्लॉक
ब्लॉकची वेळ – शनिवारी रात्री ०१.१० ते पहाटे ४.१० पर्यंत
वाहतूक ब्लॉक विभाग – दादर ते कुर्ला दरम्यान अप व डाऊन धिम्या आणि जलद मार्गावर
उपनगरीय रेल्वे सेवेवर होणारे परिणाम
– दादर येथून रात्री १०.१८ या वेळेत सुटणारी दादर- कुर्ला लोकल रद्द राहील.
– कल्याण येथून रात्री ११.१५ या वेळेला सुटणारी कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल रद्द राहील.
– कसारा येथून रात्री १० सुटणारी कसारा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल ठाणे येथे रात्री ११.४९ अंशतः रद्द होईल.
– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.२४ या वेळेत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -ठाणे लोकल रद्द राहील.
– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ४.१९ या वेळेत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कसारा लोकल ठाणे येथून ५.१४ अंशतः रद्द होईल.
– ठाणे येथून पहाटे ४.०४ या वेळेत सुटणारी ठाणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल रद्द राहील.
मेल/एक्सप्रेस होणारा परिणाम
– गाडी क्रमांक ११०२० भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस कुर्ला येथे रात्री ३.२८ ते पहाटे ४.१५ पर्यंत थांबविण्यात येईल आणि दादर येथे अंशतः रद्द केली जाईल.
– गाडी क्रमांक १२८१० हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस ठाणे येथे रात्री ३.४३ ते पहाटे ४ पर्यंत थांबवण्यात येईल आणि दादर येथे अंशतः रद्द केली जाईल.