Mankhurd Shivaji Nagar Assembly constituency 2024 SP Abu Azmi vs NDA : मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ हा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. २००९ साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००९ पासून हा मतदारसंघ समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्याकडे राहिला आहे. अबू आझमी सलग तीन वेळा येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या मोठी असून त्यावर अबू आझमी यांची पकड आहे. या मतदारसंघात सध्या तरी आझमी यांना कोणीच आव्हान देऊ शकेल अशी परिस्थिती दिसत नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) विरोधात बहुसंख्य विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. काँग्रेस, समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह इतर अनेक पक्ष यात सहभागी झाले आहेत. इंडिया आघाडी महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून ओळखली जात असून आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अबू आझमीच मानखुर्द-शिवाजीनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे.
Mankhurd Shivaji Nagar Assembly Constituency : सपाच्या अबू आझमींसमोर महायुतीचा निभाव लागणार का?
Mankhurd Shivaji Nagar Assembly constituency 2024 : सपाचे अबू आझमी येथील विद्यमान आमदार आहेत.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-10-2024 at 00:13 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024महाविकास आघाडीMahavikas Aghadiविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024समाजवादी पार्टीSamajwadi Party
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mankhurd shivaji nagar assembly constituency 2024 sp abu azmi vs mahayuti bjp asc