Mumbai Breaking News Updates, 06 august 2025 : मुंबईतील दादर येथील कबुतरखाना प्रकरणाने आज वेगळेच वळण घेतले. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येनं आंदोलक जमले. त्यांनी तेथील कबुतरखान्यावर टाकण्यात आलेली ताडपत्री फाडली. काही यानंतर आंदोलक आत शिरले व त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्प अंतर्गत सफाळा पश्चिमेला जलसार, टेंभीखोडावे व विराथन गावा दरम्यान असलेल्या डोंगरामध्ये बोगदा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून या विस्फोटांमुळे जलसाल, टेंभीखोडावे व विराथन बुद्रुक या गावांमधील २०० पेक्षा अधिक घरांच्या भिंतीला व फारशीला तडे गेले आहेत. तर पुण्यात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय तरुणीने मंगळवारी रात्री वसतिगृहातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मुंबई शहर, मुंबई महानगर, पुणे आणि नागपूर शहर आणि परिसरातील अशा महत्त्वाच्या आणि विविध क्षेत्रातील घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून मिळेल.
Mumbai Pune Nagpur Latest News Updates in Marathi
बुलेट ट्रेन बोगद्यामुळे जलसार व इतर गावातील घरांना तडे
पालघर : मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्प अंतर्गत सफाळा पश्चिमेला जलसार, टेंभीखोडावे व विराथन गावा दरम्यान असलेल्या डोंगरामध्ये बोगदा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून या विस्फोटांमुळे जलसाल, टेंभीखोडावे व विराथन बुद्रुक या गावांमधील २०० पेक्षा अधिक घरांच्या भिंतीला व फारशीला तडे गेले आहेत.
एसटी महामंडळात नोकरी हवी? अर्ज कसा कराल, जाणून घ्या सविस्तर…
नागपूर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती होणार असून यासाठी अर्ज कसा करायचा हा प्रश्न प्रत्येकालाच निर्माण होतो. त्यामुळे परीक्षेचा अर्ज कसा भरावा कुठल्या संकेतस्थळाला भेट द्यायची याची माहिती खालील प्रमाणे जाणून घ्या…
मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह ६ ऑगस्ट २०२५