Pune Breaking News Updates, 07 August 2025 : राखी पौर्णिमाचा सण तोंडावर आलाय. मुख्यमंत्र्यांच्याच शहरातल्या लाडक्या बहिणी सुरक्षीत नसल्याचा संतापजनक प्रकार बुधवारी समोर आला. नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाच्या घटना घडल्या. तर दुसरीकडे भिवंडी येथे मेट्रो मार्गिका निर्माण कामादरम्यान निष्काळजीपणा झाल्याने एका प्रवाशाच्या डोक्यात लोखंडी सळई शिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता ठाणे शहरातील धोकादायकरित्या मेट्रो मार्गिकेच्या सुरु असलेल्या कामांचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. तसंच भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील प्रत्यार्पण करारानुसार कुख्यात गुंड अबू सालेम याने २५ वर्षे प्रत्यक्ष तुरुंगवास भोगणे अपेक्षित आहे, परंतु शिक्षेतील माफीचा अथवा सवलतीचा कालावधी समाविष्ट केल्यास सालेमला ६० वर्षे तुरुंगात राहावे लागेल. त्यानंतरच त्याची सुटका करण्यात येईल, असा दावा सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात केला.
तेव्हा मुंबई शहर, उपनगर, मुंबई महानगर, पुणे आणि नागपूर शहर परिसरातील विविध महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून मिळेल.
Mumbai Pune Nagpur Latest News Updates in Marathi
दुचाकीची चावी न दिल्याने भांडण; छातीत ठोसा मारल्याने तरुणाचा मृत्यू
पुणे : दुचाकीची चावी न दिल्याने झालेल्या वादातून एकाने छातीत ठोसा मारल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी लोहियानगर भागात घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
आयटी कंपनीतील विवाहितेचा छळ, पतीसह कुटुंबीयांविरोधात गुन्हा…
नागपूर : एमटेकपर्यंत शिकलेली आणि उत्तम नोकरी असलेल्या तेजस्विनी या अभियंता विवाहितेने पती व सासरच्या लोकांविरुद्ध हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल केला.
Gadkari Rangayatan : ठाण्याचे गडकरी रंगायतन नव्या रुपात… प्रत्यक्ष पाहाणीनंतर अभिनेत्यांनी व्यक्त केली एक इच्छा…
ठाणे शहराचा सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह ओळखले जाते. या नाट्यगृहाच्या वास्तुचे नुतनीकरण करण्याचे काम गेले काही महिने सुरू होते. हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून लवकरच रसिकांसाठी रंगायतन खुले होणार आहे.
पोशीर, शिलार धरणे दृष्टीपथात, पाटबंधारे विभागाकडून निविदा जाहीर, पाच वर्षात धरण मार्गी लागण्याची आशा
बदलापूर : मुंबई महानगर प्रदेशातील विस्तारणाऱ्या शहरातील लोकसंख्येची भविष्यातील तहाण भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या रायगड जिल्ह्यातील पोशीर आणि शिलार ही धरणे आता दृष्टीपथात आहेत. राज्याच्या जलसंपदा विभागातील कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने या दोन्ही धरणांच्या उभारणीसाठी निविदा जाहीर केल्या आहेत.
वाहन चालकांचा पदोपदी जीव धोक्यात; डोक्यावर मेट्रोच्या कामाचा धोका तर, रस्त्यावर खड्ड्यांचा त्रास
ठाणे : भिवंडी येथे मेट्रो मार्गिका निर्माण कामादरम्यान निष्काळजीपणा झाल्याने एका प्रवाशाच्या डोक्यात लोखंडी सळई शिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता शहरातील धोकादायकरित्या मेट्रो मार्गिकेच्या सुरु असलेल्या कामांचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.
उपराजधानी हादरली! एकाच दिवशी तीन अल्पवयीनांचा विनयभंग, पॉक्सो कायद्यांतर्गत…
नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाच्या घटना घडल्या. पोलिसांनी आरोपींविरुद्ध पोक्सो कायदा आणि तिन्ही प्रकरणांमध्ये विनयभंगाच्या कलमांखाली गुन्हे दाखल केले.
Abu Salem : सालेमला ६० वर्षे तुरुंगात काढावी लागतील, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती
मुंबई : भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील प्रत्यार्पण करारानुसार कुख्यात गुंड अबू सालेम याने २५ वर्षे प्रत्यक्ष तुरुंगवास भोगणे अपेक्षित आहे, परंतु शिक्षेतील माफीचा अथवा सवलतीचा कालावधी समाविष्ट केल्यास सालेमला ६० वर्षे तुरुंगात राहावे लागेल. त्यानंतरच त्याची सुटका करण्यात येईल, असा दावा सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात केला.
मुंबई पुणे नागपूर न्यूज ७ ऑगस्ट २०२५