Pune Latest News Today 15 July 2025 : मुंबईत मंगळवारपासून पुढील दोन ते तीन दिवस हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईसह राज्यातही पावसाचा जोर ओसरणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरमधील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वत:च्या जातीबद्दल उघडपणे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी ब्राह्मण जातीचे काय दु:ख आहे याची माहिती दिली. तर पुण्यातील तुळशीबागेत चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी दागिने, रोकड असा ३८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली.

तेव्हा मुंबई शहर, मुंबई उपनगर तसंच मुंबई महानगरातील, पुणे – नागपूर शहर परिसरातील विविध क्षेत्रातील घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल.

Live Updates

Pune Mumbai Nagpur   News Updates in Marathi

11:43 (IST) 15 Jul 2025

पुणे जिल्ह्यातील ३२ रेशन दुकानांत काळाबाजार; काय कारवाई होणार? मंत्री छगन भुजबळ म्हणाले…

पुण्यातील अन्न व धान्य वितरण अधिकाऱ्यांच्या अधिनस्त परिमंडळ कार्यालयांकडून रेशन धान्य दुकानांची मे आणि जून २०२५ मध्ये नियमित तपासणी करण्यात आली. या …वाचा सविस्तर
11:42 (IST) 15 Jul 2025

हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीवर उपाय! खासदार सुप्रिया सुळेंसह आयटीयन्सचा शासकीय यंत्रणांसमोर प्रस्ताव

आयटी पार्क परिसरात जास्त रहदारीच्या वेळी स्कूलबससाठी स्वतंत्र मार्गिका द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज असोसिएशनने शासकीय यंत्रणांकडे केली आहे. …सविस्तर बातमी
11:42 (IST) 15 Jul 2025

इमारतीच्या स्लॅबचा तुकडा पडला; आरोग्य उप संचालक कार्यालयाला स्थलांतराची वेळ

चुन्याचा थर हळूहळू खालच्या दिशेने येत असल्याने ही इमारत खिळखिळी होत आहे.

सविस्तर वाचा…

11:42 (IST) 15 Jul 2025

पुण्यात तुळशीबागेत चोरट्यांचा सुळसुळाट

खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी दागिने, रोकड असा ३८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे …सविस्तर वाचा
11:41 (IST) 15 Jul 2025

झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी पुण्याच्या आमदाराचा विधानसभेत आवाज !

शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे कर्वेनगर येथील खासगी जागेतील झाड पडून दोन जणांचा मृत्यू झाला होता. …अधिक वाचा
11:34 (IST) 15 Jul 2025

म्हाडाच्या चितळसर घराच्या किमती ५० लाखांवर, सोडतीच्या प्रतिक्षेत असलेल्यांचा हिरमोड

चितळसरमधील या इमारतींत तब्बल ८५९ सदनिका आहेत. परंतु हे घर आवाक्याबाहेर असल्याचे सोडतीमध्ये इच्छूक असलेल्या अनेकांनी सांगितले. …वाचा सविस्तर
11:31 (IST) 15 Jul 2025

ठाण्यात शिंदे गटाच्या या नेत्याच्या इशाऱ्यानंतर बेकायदा बांधकामावर कारवाई; शास्त्रीनगर भागातील अनधिकृत गाळे, चाळींच्या बांधकामे तोडली

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने पथके तयार करून बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू केली असली तरी भूमाफियांकडून बांधकामे उभारण्याचे प्रकार सुरूच असल्याचे समोर आले होते. …सविस्तर बातमी
11:31 (IST) 15 Jul 2025

दिल्ली, अहमदाबादप्रमाणे नागपूर विमानतळावर ‘आरव्हीआर’, विमान अपघातानंतर सतर्कता

वाईट हवामानामुळे किंवा कमी दृश्यमानतेमुळे विमानांना अनेक वेळा इतरत्र वळवावे लागते. …वाचा सविस्तर
11:24 (IST) 15 Jul 2025

बिस्कीटच्या पुड्यात ६२ कोटींचे कोकेन…मुंबई विमानतळावरून महिलेला अटक

महिलेकडे एकूण ६२६१ ग्रॅम कोकेन सापडले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ६२ कोटी ६० लाख रुपये आहे. …सविस्तर बातमी
11:18 (IST) 15 Jul 2025

इंडोनेशियन व भारतीय संशोधकानी शोधली अवघ्या ३० मिलिमीटर लांबीची पाल

भारतीय आणि इंडोनेशियन वन्यजीव शास्त्रज्ञांनी आसाममध्ये नवीन पालीच्या प्रजातीचा शोध लावला. उत्तरपूर्व भारतातील जैवविविधतेने समृद्ध आणि घनदाट परिसरात भारतीय व इंडोनेशियन संशोधकांच्या टीमने एका नवीन पालीच्या प्रजातीचा शोध लावला आहे.

अधिक वाचा…

11:15 (IST) 15 Jul 2025

पुण्यात तुळशीबागेत चोरट्यांचा सुळसुळाट

पुणे : तुळशीबागेत चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी दागिने, रोकड असा ३८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर बातमी…

11:14 (IST) 15 Jul 2025

आता ‘ही’ राज्ये पावसाच्या रडारवर, स्कायमॅटच्या अंदाजानुसार…

विदर्भात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने काहीशी उसंत घेतली. आता कोकणात धुमाकूळ घालणारा पाऊस देखील उसंत घेत आहे. थोडक्यात महाराष्ट्रात पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. मात्र, पावसाने आपला मोर्चा आता उत्तरेकडील राज्यांकडे वळवला आहे.

अधिक वाचा…

11:12 (IST) 15 Jul 2025

वांद्रे – वरळी सागरी सेतूजवळ वाहनाच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

वाहन चालक गुरविंदर सिंग कुलबीर सिंग किर (४८) सोमवारी सकाळी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर झाला. …सविस्तर वाचा
11:12 (IST) 15 Jul 2025

ब्राह्मण मुख्यमंत्री आणि स्वतः मंत्री असतानाही गडकरी असे का म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मणांना किंमत नाही…”

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या अनेक भाषणांमधून जात, धर्म, पंथ यांना महत्त्व देत नाही असे सांगितले आहे. तसेच जातीची गोष्ट करणाऱ्यांना गडकरी जुमानत नाहीत हे सर्वश्रुत आहे. असे असतानाही त्यांनी नागपुरमधील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वत:च्या जातीबद्दल उघडपणे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी ब्राह्मण जातीचे काय दु:ख आहे याची माहिती दिली.

सविस्तर बातमी…

11:10 (IST) 15 Jul 2025

मध्य रेल्वेवर आठ वर्षांत ८,२७३ प्रवाशांचा मृत्यू

मुंबई : गेल्या साडेसात वर्षांत म्हणजेच जानेवारी २०१८ ते मे २०२५ या कालावधीत मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करताना ८,२७३ प्रवाशांचा मृत्यू झाला. रुळ ओलांडताना आणि धावत्या लोकलमधून पडून सर्वाधिक मृत्यू झाल्याची कबुली मध्य रेल्वेने सोमवारी उच्च न्यायालयात नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करून दिली.

सविस्तर वाचा…

11:09 (IST) 15 Jul 2025

मुंबईत हलक्या सरींचा अंदाज; राज्यातही पावसाचा जोर कमी राहणार

मुंबईत मंगळवारपासून पुढील दोन ते तीन दिवस हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईसह राज्यातही पावसाचा जोर ओसरणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

सविस्तर बातमी…

मुंबई पुणे नागपूर न्यूज   १५ जुलै २०२५