Mumbai News Updates, 16 July 2025 : फेसबुकवर लहान मुलींच्या अश्लील चित्रफिती प्रसारित केल्याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. उत्तराखंडमधील नैनिताल येथे २०२२ मध्ये हे प्रकरण उघडकीस आले होते. यापैकी काही चित्रिफिती या वांद्रे येथून अपलोड केल्याचे आढळल्यानंतर खेरवाडी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत पुढील पाच-सहा महिन्यात होण्याची शक्यता असून वेगवेगळ्या पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते विविध पक्षात प्रवेश करत असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नागपूर शहरात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे मध्य नागपुरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत.

ऑनलाइन प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून नोंदणी केल्यानंतर भाडे नाकारल्यास वायुवेग पथकाद्वारे कारवाई केली जाते. नोंदणी केल्यानंर भाडे नाकारल्याप्रकरणी १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत एक हजार १५९ ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई केली असून दोन लाख ५८ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिली.

कल्याणीनगर येथील पोर्शे माेटारीच्या अपघात प्रकरणात संगणक अभियंता तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाला सज्ञान ठरवून त्याच्याविरुद्ध खटला चालविण्याचा अर्ज बाल न्याय मंडळाने (जेजीबी) मंगळवारी फेटाळला. या निर्णयामुळे अल्पवयीन मुलाला दिलासा मिळाला आहे.

नागपूर, मुंबई, पुणे या शहरांच्या बातम्या जाणून घेण्यासाठी वाचा LIVE BLOG.

Live Updates

Mumbai Pune Nagpur News Live Updates

Pune Mumbai Nagpur Live News Updates in Marathi

11:30 (IST) 16 Jul 2025

मुले पळवणारी टोळी सक्रीय झाल्याची अफवा

काही लोक फिरत असून ते लहान मुलांना विविध आमिष दाखवून पळवण्याचा प्रयत्न करत असल्याची अफवा पसरली आहे. …सविस्तर वाचा
11:30 (IST) 16 Jul 2025

मुख्यमंत्र्यांच्या पालक जिल्ह्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांची दोन हजार पदे रिक्त; गडचिरोलीचा विकास…

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागील दोनहून अधिक वर्षापासून गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये फडणवीसांनी गडचिरोलीला क्रमांक एकचा जिल्हा बनवू अशी घोषणा केली आहे. …सविस्तर वाचा
11:17 (IST) 16 Jul 2025

जयंत पाटील यांच्या राजकीय खेळीचीच चर्चा

आठ वर्षापुर्वी आमदार पाटील यांच्याकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद आले. त्यावेळीही त्यांच्या भाजप प्रवेशाच्या अफवा पसरत होत्या. …अधिक वाचा
11:07 (IST) 16 Jul 2025

चक्क ‘इनक्युबेटर’ मध्ये जन्मली अजगराची पिल्लं

सेंटरमधील “इनक्यूबेटर” मध्ये ठेवलेल्या अंड्यांमधून अजगराची पिल्लं जन्माला आली आणि त्यांना नैसर्गिक अधिवासात देखील मुक्त करण्यात आले. …सविस्तर बातमी
11:05 (IST) 16 Jul 2025

आणखी एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येने उपराजधानी हादरली! नीट परीक्षेतील अपयशातून..

अलिकडेच आलेल्या नीट परीक्षेच्या निकालात मिळालेल्या अपयशामुळे ही मुलगी मानसिकदृष्ट्या पुरती खचली होती. तिचे वडील शहर वाहतूक पोलीस दलात कार्यरत आहेत. …सविस्तर वाचा
11:02 (IST) 16 Jul 2025

दहाव्या मजल्यावरून पडून तरुण अभियंत्याचा मृत्यू; विकासकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

भागीदार आणि साईट सुपरवायझर यांच्याविरोधात निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बांधकामस्थळी सुरक्षेची साधने उपलब्ध नसल्याचा आरोप मयत ओंकारच्या वडिलांनी केला होता. …अधिक वाचा
11:01 (IST) 16 Jul 2025

गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आता काँक्रिटचा घाट

गेल्या अनेक वर्षांपासून या भागात प्राधिकरणांकडून दुरुस्तीचे विविध प्रयोग करण्यात आले. परंतु दरवर्षी पावसाळ्यात घाट रस्त्यात खड्डे पडत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. …सविस्तर वाचा
11:00 (IST) 16 Jul 2025

कलिना येथील एअर इंडियाच्या वसाहतीतून बेदखल करण्याची कारवाई योग्य; माजी कर्मचाऱ्याचे अपील उच्च न्यायालयाने फेटाळले

या कर्मचाऱ्यांवर एएआय की सार्वजनिक परिसर (अनधिकृत रहिवासी निष्कासन) कायद्यांतर्गत (पीपीई) निष्कासनाची कारवाई करावी हा मूळ मुद्दा न्यायालयापुढे होता. …सविस्तर बातमी
10:59 (IST) 16 Jul 2025

राजकीय आशीर्वादाने बनावट दारूचा व्यवसाय! आरोपी पवन जयस्वालच्या घरातून विविध कंपन्यांचे ‘स्टीकर’ जप्त

या दुकानाचा परवाना नागपुरातील अश्वजीत गाणार यांचा आहे. दरम्यान, दुसरा आरोपी श्रवण जयस्वाल फरार आहे. राजकीय आशीर्वादाने जयस्वाल बंधूंचा बनावट दारूचा व्यवसाय सुरू आहे. …सविस्तर वाचा
10:58 (IST) 16 Jul 2025

एसआयटी चौकशीचा फास आवळताच उद्धव ठाकरेंचा शिलेदार भाजपात; चंद्रपूर जिल्हा बँक निवडणुकीत ट्विस्ट..

मंगळवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, तसेच कीर्तीकुमार भांगडिया, किशोर जोरगेवार आणि करण देवतळे या जिल्ह्यातील तीन आमदारांच्या उपस्थितीत शिंदे यांनी शिवबंधनातून मुक्त होत भाजपचे कमळ हाती घेतले. …अधिक वाचा