Nagpur News Live Updates, 23 July 2025: मुंबई शहर आणि उपनगरात येत्या काही तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या पावसाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
जगातील नामांकित इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने गेल्या आठवड्यात भारतातील त्यांचे पहिले शो रुम मुंबईत सुरू केले. मात्र, शो रुमवरील देवनागरी लिपीतील टेस्ला हे नाव हिंदीत आहे की मराठीत, यावरून हिंदी – मराठी भाषिकांमध्ये वाद सुरू आहे. संबंधित नाव हिंदीत असल्याचा दावा करणाऱ्या अनेक पोस्ट समाजमाध्यमांवर केल्या जात असून त्यावर मराठी भाषिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
या घडामोडींसह मुंबई, मुंबई महानगर, नागपूर आणि पुणे शहर परिसरातील ताज्या बातम्या एका क्लिकवर जाणून घ्या…
Pune Mumbai Nagpur Breaking News Live Updates in Marathi
कल्याणमध्ये मराठी तरूणीला मारहाण करणाऱ्या गोकुळ झा याला पोलीस कोठडी, अटक टाळण्यासाठी चेहरापट्टी बदलली
बावनकुळे: उद्धवजींचं कौतुक राज्याच्या राजकारणाला सकारात्मक दिशा देणार
देशात संस्कृती रुजवली सामान्यांनी, दावा मात्र उच्चभ्रूंचा! श्रीकृष्ण हे गवळी, तर व्यास, वाल्मिकी कोळी…
‘माफ करा, यापुढे मी मराठीत बोलणार…’ त्या मुजोर परप्रांतिय महिलेने मागितली माफी
मुख्यमंत्र्यांच्या गडातच महिलांचं रात्रभर भयभीत वास्तव; मुलीच्या सुरक्षिततेकडे कांग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले
ॲप आधारित टॅक्सी चालकांचे चक्का जाम आंदोलन पुढे ढकलले… आरटीओ सकारात्मक… लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सुरू…
पोलिसांची मारहाण शासकीय कर्तव्य? उच्च न्यायालय काय म्हणाले….
एपीएमसीत दुहेरी पार्किंगची समस्या, सात महिन्यांत ६,९३३ वाहनांवर दंडात्मक कारवाई
पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस; जळगावमध्ये हतनूरचा विसर्ग वाढला
पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका; सावध राहा, सुरक्षित रहा! जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या एकाच छताखाली… जाणून घ्या अर्ज कसा करायचा…
श्रावणात पहिल्यांदाच एसटीचे पॅकेज टूर; एसटी प्रशासनाकडून ज्योतिर्लिंग आणि अष्टविनायक दर्शनाचे नियोजन
विमान प्रवासात पत्नीला शेजारचे आसन दिले नाही…भाजपच्या पदाधिकाऱ्याची थेट केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांकडे तक्रार!
कृषी कर्ज प्रक्रिया ऑगस्टपासून ऑनलाइन ? जाणून घ्या, केंद्र सरकारचा अमुलाग्र बदल करणारा निर्णय
शेतकऱ्यांना शेतीच्या बांधावरून भ्रमणध्वनीद्वारे ऑनलाइन अर्ज करून कर्ज मिळविता येणार आहे.
नाशिकच्या द्वारका चौकातील वाहतूक कोंडी दूर होणार, नव्या भुयारी मार्गाचे नियोजन
मुंबई-आग्रा आणि नाशिक-पुणे महामार्ग यांचा संगम होणारा द्वारका चौफुली हा अतिशय वर्दळीचा भाग आहे.
स्थानिक भूमिपुत्रांच्या आंदोलनाकडे सिडकोचे दुर्लक्ष, ८३ दिवसांपासून आंदोलन सुरू; साडेबारा टक्के भूखंडाचा प्रश्न अधांतरीच
हिवाळ्यातील धुक्याचा आता अधिक व्यापक अभ्यास का? काय आहे वायफेक्स प्रकल्प?
सोलापूरमध्ये अजित पवार गटात बेकीचे दर्शन
‘आले तर सोबत, नाही तर त्यांना सोडून ‘ अशी भूमिका घेतल्याने राजन पाटील आणखी दुखावले. खरे तर त्यांच्यातील संघर्ष अजित पवार यांनी मिटवायला हवा होता.
हिवाळ्यातील धुक्याचा आता अधिक व्यापक अभ्यास का? काय आहे वायफेक्स प्रकल्प?
जळगावमधून १२ हजार कोटींची निर्यात; कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राचा मोठा वाटा
खुल्या जागतिक व्यापार करारामुळे निर्यातीच्या मोठ्या संधी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उपलब्ध झाल्या आहेत.
आरोपानंतरही एमपीएससीत वादग्रस्त अधिकाऱ्याची एन्ट्री, पद व गोपनीयतेची शपथही घेतली…
सैनिकांना दोन हजारपेक्षा अधिक पर्यावरणपूरक राख्यांची भेट, वयोवृध्द विमलताईंचा उत्साह
वयाच्या ७३ व्या वर्षातही त्यांचा राखी तयार करण्याचा उत्साह हा तरूणाईला लाजवेल असा आहे.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम न करणाऱ्या शासकीय यंत्रणांवर आता थेट गुन्हे!
पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील नागरी समस्या प्रकर्षाने जाणवत आहेत. या प्रकरणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मात्र, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पावले उचलली जात नसल्याची बाब विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत मंगळवारी उघड झाली.
राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे; पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींची कबुली
‘टेस्ला’ मराठी-हिंदी… नवा वाद…; शो रूमवरील नाव नेमके कोणत्या भाषेत ?
मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह २३ जुलै २०२५