Maharashtra Rain Updates Live News 28 May 2025 : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या सुनेची आत्महत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली असताना नागपुरात भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या कुटुंबातील प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. आमदार परिणय फुके यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यंदा मोसमी पाऊस जोरदार बरसणार असून त्याची चुणूक पहिल्याच दिवशी मिळाली आहे. यंदा राज्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने मराठवाड्यात सर्वाधिक म्हणजे सरासरीच्या ११२ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरांतील, परिसरांतील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.
Mumbai Pune Nagpur Breaking News Live Updates, 28 May 2025
खेलो इंडिया सातही स्पर्धांमध्ये मनमाडच्या वेटलिफ्टर्सचा दबदबा, १८ पदकांची कमाई
पशुधन पर्यवेक्षकाकडून चक्क जनावरांच्या औषधांची चोरी
ठाण्यातील गडकरी रंगायतन परिसरात रस्ता खचला, ड्रेनेजचे चेंबर खचून रस्त्यावरती पडला खड्डा
अकोल्यात तीन तासांत तब्बल ९५.६ मि.मी. पावसाची नोंद
४५ व्या मजल्यावरून उडी मारून मुलीची आत्महत्या, गोरेगाव येथील घटना
पाणी उपसा करणारी यंत्रणा कार्यान्वित न झाल्याने कंत्राटदारांना १० लाखांचा दंड
बेलापूरची वाताहत मानवनिर्मितच, धारण तलावांच्या वाहिन्यांमध्ये काँक्रीटचे थर
पोटात बाळ, बाळाच्या पोटात परत बाळ? दुर्मिळ घटना आणि अवघड शस्त्रक्रिया…
अमर्याद मातीचा भराव आणि नालेसफाईकडे दुर्लक्ष; सिडको, नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे उरणमध्ये दैना
रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये लाच लुचपत विभागाची मोठी कारवाई; फेरफार नोंदीसाठी लाच घेताना मंडळ अधिकारी, तलाठी व शिपायाला पकडले
बीएसयुपी घरातील स्लॅबचे प्लास्टर कोसळले; बदलापुरातील घटना, महिला आणि चिमुकला बचावला
येमेनी नागरिकाची तातडीने सुटका करा, उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
बारामतीत पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या
प्रेयसीसोबत बोलणं बंद झाल्याने तरुणाने तिच्या घरापुढील दुचाकी पेटवल्या
मुंबई: प्रतिकूल हवामानामुळे नियोजित पाणीकपात रद्द, शहर तसेच पूर्व उपनगरवासियांना दिलासा
Mumbai Water Supply Today : पांजरापूर येथील उदंचन केंद्रातीत टप्पा क्रमांक १ येथे नवीन दाबवाढ नियंत्रण टाकी कार्यान्वित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता.
डंपरच्या मातीमुळे रस्त्याची दुरवस्था, महापालिकेच्या कामाचा फटका, तर अपघाताचा धोका
नालेसफाईच्या कामात पावसाचा खोडा, पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण होण्याची चिन्ह धूसर; पुराचा धोका
जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, देशात १०८ टक्के तर राज्यात १०६ टक्के
यंदा मोसमी पाऊस जोरदार बरसणार असून त्याची चुणूक पहिल्याच दिवशी मिळाली आहे. यंदा राज्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात वळिवाच्या पावसाचा अधिक जोर, सर्वाधिक पाऊस साताऱ्यात
राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासून वळिवाच्या पावसाने जोर धरला होता. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
खराडी काॅलसेंटर प्रकरणात पोलिसांचे पथक गुजरातमध्ये, ‘डिजिटल’ अटकेची भीती दाखवून अमेरिकन नागरिकांची फसवणूक
खराडीतील कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना ‘डिजिटल अटक’ची भीती दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या प्रकरणात मुख्य सूत्रधार करण शेखावत आणि तीन आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक गुजरातला रवाना झाले आहे.
शाळकरी मुलीच्या मदतीमुळे मोटारसायकस्वाराला जीवदान
शिरूर तालुक्यात संततधार सुरू असताना खोल पाण्यात पडलेल्या दुचाकीस्वाराला इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अनुष्का फराटे या मुलीने धाडसाने वाचवले.
मुंबई : २४ तासांत पडझडीच्या घटनांनी शंभरी ओलांडली, एक ठार; एक जखमी
मुंबईत दाखल झालेल्या पहिल्याच मोसमी पावसाने मुंबईची तुंबई केली. या पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरात पडझडीसह शॉर्ट सर्किटच्या शंभरहून अधिक घटना घडल्या.
मुंबईतील पुराचे मंत्रिमंडळात पडसाद
भाजपने महाविकास आघाडीच्या काळातील रखडलेल्या प्रकल्पांना दोष देत पालिकेच्या कारभारावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे.
१४०० झाडांसाठी एमएमआरडीएला पालिकेची ७ कोटीची शुल्क आकारणी
मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे