Mumbai Pune Nagpur Breaking News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता अनधिकृत बांधकामांवर मनमानी पद्धतीने कारवाई करण्यावर राज्य सरकारने लगाम कसला आहे. कोणतेही पाडकाम करण्यासाठी किमान १५ दिवस आधी ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. तर आज देशात जात, उपजात आणि धर्माच्या नावाने भांडणे होत आहेत. महापुरुषांची जयंती साजरी करताना आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे,’ असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी बुधवारी व्यक्त केले. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे सह राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील विविध घडामोडींच्या बातम्या या live blog च्या माध्यमातून वाचता येतील.

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Live Updates, 1st may 2025 : मुंबई, पुणे, नागपूर न्यूज लाईव्ह अपडेट्स

20:02 (IST) 1 May 2025

रस्ते कॉंक्रिटीकरण कामात निष्काळजीपणा भोवला; महानगरपालिकेतील दुय्यम अभियंता निलंबित,कंत्राटदाराला ५० लाख रुपयांचा दंड

मुंबई महापालिकेतील एका दुय्यम अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वांद्रे पश्चिम परिसरातील हा रस्ता असून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याबद्दल रस्ते कंत्राटदाराला ५० लाख रुपये दंड करण्यात आला आहे. …अधिक वाचा
19:34 (IST) 1 May 2025

पुणे वर्तुळाकार रस्त्याच्या संरेखनात बदल; एमएसआरडीसीने ८०० कोटी रुपये वाचले,नि. १८० घरेही वाचली

या प्रकल्पातील भूसंपादन जवळजवळ पूर्ण झाले असून भूसंपादनासाठी येणाऱ्या अपेक्षित खर्चातील ८०० कोटी रुपयांची बचत एमएसआरडीसीने केली आहे. …वाचा सविस्तर
19:30 (IST) 1 May 2025

विरारमध्ये टँकरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

संजना संदीप राणे (३४) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. …सविस्तर बातमी
19:13 (IST) 1 May 2025

गरजू रुग्णांना उपचारासाठी तत्काळ मदत, नागपुरात विशेष कक्ष

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. …सविस्तर बातमी
19:00 (IST) 1 May 2025

गर्भाशयमुखाच्या कर्करोगावर एम्सने विकसित केली चाचणी; कर्करोगावर मात करण्यास होणार मदत…

सर्वाधिक आढळणारा कर्करोग म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा (सर्व्हायकल कॅन्सर). २०२२ मध्ये देशात या आजाराचे सव्वा लाख नवीन रुग्ण आढळले, तर जवळपास ८० हजार महिलांचा मृत्यू या रोगामुळे झाला …अधिक वाचा
18:56 (IST) 1 May 2025

जातनिहाय जनगणना: भाजप मोदींच्या अभिनंदनाचे ठराव राज्यभर घेणार, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची घोषणा

देशात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व आर्थिक उत्क्रांतीचे नवे पर्व जातनिहाय जनगणनेमुळे सुरू होईल. …अधिक वाचा
18:43 (IST) 1 May 2025

दहा वर्षांत हिवताप बाधित रुग्ण संख्येत ६२.७६ टक्के घट!

२०१५ मध्ये राज्यात ५६,६०३ हिवताप बाधित रुग्ण होते, आरोग्य विभागाने प्रभावीपणे राबविलेल्या उपाययोजनांमुळे त्यात घट होऊन सन २०२४ मध्ये २१,०७८ हिवताप बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. …सविस्तर वाचा
17:47 (IST) 1 May 2025

अमरावती : जादूटोण्याचा आरोप करून विवाहितेची गावभर बदनामी; वरूड पोलिसांत तिघांवर गुन्हा

पोलिसांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ अंतर्गत कलम ३(२) सह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. …अधिक वाचा
17:32 (IST) 1 May 2025

अमरावती : जुनी पेन्‍शन योजनेची प्रकरणे प्रलंबित, शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा

कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्त वेतन नियम १९८२ आणि अंशदायी निवृत्त वेतन नियम १९८४ लागू करावेत, असे नमूद आहे. …सविस्तर बातमी
17:24 (IST) 1 May 2025

कामगार दिनी ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, बेमुदत आंदोलनाचा इशारा…

राज्यातील लाखो कामगार व कर्मचाऱ्यांनी आज १ मे, कामगार तथा महाराष्ट्र दिन विविध कार्यक्रमांनी साजरा केला. …सविस्तर बातमी
17:14 (IST) 1 May 2025

सराइताकडून भर चौकात महिलेचा विनयभंग, विश्रांतवाडी पोलिसांकडून सराइतासह साथीदारांवर गुन्हा

याप्रकरणी सराइत गुन्हेगार संकेत सावंत (रा. कळस, आळंदी रस्ता, विश्रांतवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …अधिक वाचा
16:17 (IST) 1 May 2025

न्यायालयात बनावट जामीनदार हजर; तिघांविरोधात गुन्हा दाखल, दोघे अटकेत…

न्यायालयाच्या आदेशानुसार टिळक नगर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. …सविस्तर बातमी
15:43 (IST) 1 May 2025

काश्मीर दहशतवादी हल्ला आणि जातीनिहाय जनगणनेचा काय संबंध?

काँग्रेस पक्षाने सातत्याने जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर केंद्र सरकारने जातीनिहाय गणना करण्याचा निर्णय घेतला आहे. …वाचा सविस्तर
15:37 (IST) 1 May 2025

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार, अमरावतीत दलालाला रंगेहाथ पकडले!

आरपीएफ ही प्रवाशांची उत्तम सुरक्षा, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रेल्वे मालमत्तेच्या संरक्षणासाठी एक प्रमुख सुरक्षा आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था आहे. …अधिक वाचा
15:21 (IST) 1 May 2025

धान बोनस घोटाळा : चौकशी समितीच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड; भूमिहीन, अल्पभूधारक…

गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुका सर्वाधिक धान उत्पादक तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे दरवर्षी याठिकाणी धानविक्रीतून मोठी उलाढाल होत असते. …सविस्तर वाचा
15:05 (IST) 1 May 2025

पत्नीच्या प्रियकराचा काटा काढायला नवरा मित्रांसोबत गेला अन् वाटेत…

पत्नीला त्रास देणाऱ्या तिच्या प्रियकराचा काटा काढण्याकरीता निघालेल्या विवाहितेच्या पतीसह त्याच्या दोन मित्रांना भंडाऱ्यात दोन जिवंत काडतुस आणि एका पिस्तूलासह एलसीबी पथकाने एका ढाब्यावर पकडले. …वाचा सविस्तर
15:05 (IST) 1 May 2025

सोलापूर रस्त्यावर मोटारीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू , मोटारचालक अटकेत

भरधाव मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील द्राक्ष संशोधन केंद्र परिसरात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मोटारचालकाला अटक केली. …सविस्तर वाचा
15:03 (IST) 1 May 2025

उपराजधानीत महाराष्ट्र दिनाचा निषेध, काळा दिवस पाळत विदर्भाचा झेंडा…

कार्यकर्त्यांनी काळे कपडे, डोक्याला व बाजूला काळी पट्टी बांधून निषेध नोंदविण्यात आला व नारे निर्देशन करण्यात आले. …अधिक वाचा
14:54 (IST) 1 May 2025

अंधेरी आरटीओमध्ये महिलेचा गोंधळ; महिला कर्मचाऱ्याला मारहाण,संगणकाची तोडफोड…

सदर महिलेने आरटीओ कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याला मारहाण करून संगणकाची तोडफोड केली. …सविस्तर वाचा
13:02 (IST) 1 May 2025

Bhendwal Buldhana Ghat Mandani: भेंडवळचे भाकीत : देशाची आर्थिक स्थिती बिकट; ‘राजा’ तणावात, पीक-पाणी साधारण, युद्ध झालेच तर…

शेतकऱ्यांच्या आस्था आणि श्रद्धेच्या कसोटीवर शेतकऱ्याना आपलीशी वाटणारी भेंडवळची घटमांडणी अंदाजे साडेतीनशे वर्षांपूर्वी सुरू झाली आहे. …सविस्तर बातमी
12:35 (IST) 1 May 2025

Nagpur Crime News : खळबळजनक! दारूचा ग्लास हातातून पडून फुटल्यामुळे ग्राहकाचा खून, नागपुरात महिन्याभरात १४ वे हत्याकांड

वाडीतील दारुच्या भट्टीत आलेल्या एका ग्राहकाच्या हातातून दारूचा ग्लास खाली पडल्याने फुटला. …सविस्तर बातमी
12:30 (IST) 1 May 2025

महापे, मुंब्रा, शिळफाटा रस्त्यावरील कोंडीमुळे वाशी ते कल्याण प्रवासासाठी सहा तास; गरमाईचा ताप आणि कोंडीमुळे प्रवासी हैराण

वाशीहून संध्याकाळी सहा वाजता सुटलेली नवी मुंबई परिवहन उपक्रमाची बस कल्याणला पोहचण्यासाठी रात्री अकरा वाजले. …वाचा सविस्तर
12:24 (IST) 1 May 2025

नियोजित वेळेअगोदर अजित पवारांनी कार्यालयाचे उद्घाटन केल्याने भाजप खासदार मेधा कुलकर्णी नाराज

भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी या कार्यक्रमाच्या अगोदर दहा मिनिट शिल्लक असताना पोहोचल्या, त्यावेळी अजित पवार यांचा काही अधिकारी, पदाधिकारी सत्कार करताना मेधा कुलकर्णी यांना दिसले. …अधिक वाचा
11:54 (IST) 1 May 2025

जिल्हा परिषदेच्या जिल्हा अंतर्गत बदल्या अडकल्या, गुरुजी हवालदिल; ५ मे कडे लक्ष

संच मान्यतेच्या अनुषंगाने १५ मार्च रोजी शासन निर्णय काढला आहे. या आदेशामुळे एकेका जिल्ह्यातून शेकडोंच्या संख्येने शिक्षकांची पदे कमी होणार आहेत. …सविस्तर वाचा
11:31 (IST) 1 May 2025

सरकारचे प्रशासकीय मूल्यमापन, १२ विभागांची १०० टक्के उद्दिष्ट पूर्तता

एकूण ४८ विभागांपैकी १२ विभागांनी आपली १०० टक्के उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी १८ विभागांनी ८०% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली. …अधिक वाचा
11:11 (IST) 1 May 2025

सांताक्रुझ हिट ॲण्ड रन प्रकरण… तब्बल आठ महिन्यांनंतर गुन्हा दाखल… दुचाकीस्वाराचा शोध सुरू…

सांताक्रूझ पूर्वेकडील वाकोला परिसरातील हनुमान मंदिराजवळील पश्चिम द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला. …सविस्तर बातमी
10:54 (IST) 1 May 2025

यंत्रमानव करणार मूत्रपिंड शस्त्रक्रिया… नागपूर मेडिकलमध्ये राज्यातील पहिली…

युरोपियन देशांत अवयवदानाचा दर १० लाखांत ४० असला तरी भारतात ०.०१ टक्केच आहे. त्यातही देशात अडीच लाख मूत्रपिंडाची गरज असताना केवळ ७ हजार मिळतात. …सविस्तर बातमी
10:52 (IST) 1 May 2025

मुंबई : महानगरपालिकेच्या आयसीएसई शाळेच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश, शाळेचा १०० टक्के निकाल

महानगरपालिकेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२० – २१ मध्ये जी उत्तर विभागात मुंबई पब्लिक स्कूल वुलनमिल ही ‘आयसीएसई’ मंडळाची शाळा सुरू करण्यात आली. …सविस्तर वाचा
10:41 (IST) 1 May 2025

मुंबई : खड्ड्यांसाठी ७९ कोटी, खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेकडून यंदाही निविदा

सध्या मुंबईत एकाच वेळी ७०१ किमी लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. …सविस्तर वाचा
10:23 (IST) 1 May 2025

महाराष्ट्र दिनी आज विदर्भवादी काळा झेंडा फडकवणार… विदर्भ राज्य आंदोलन समिती म्हणते…

विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून नागपुरात महाराष्ट्र दिनाचा निषेध करीत १ मे रोजी संविधान चौकात विदर्भाचा झेंडा फडकविण्याचा निर्धार …अधिक वाचा

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे