Mumbai Pune Nagpur Breaking News Updates Today 02 May 2025 : केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व भाजपात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्याची आठवण भाजपाला करून दिली आहे. तसेच महिला मंत्र्याला अश्लील संदेश पाठवणाऱ्या २५ वर्षीय तरुणाला नोडल सायबर पोलिसांनी पुण्यातून अटक केली. अमोल काळे असे या आरोपीचे नाव असून तो महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. या बातम्यांसह राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्या या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून सविस्तर जाणून घ्या.

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 02 May 2025

22:29 (IST) 2 May 2025

पीओपी बंदमुळे उंच गणेशमूर्ती साकारणे अशक्य, सुवर्णमध्य काढण्याची सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी

पीओपी बंदी करताना श्रद्धा, संस्कृती, परंपरा, ऐतिहासिक वारसा या घटकांचा विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे सरसकट पीओपी बंदी करण्यापूर्वी त्यातून सुवर्णमध्य काढावा, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. …अधिक वाचा
22:17 (IST) 2 May 2025

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सिनेमांची वितरण व्यवस्था बळकट व्हायला हवी – दिनेश विजन

चित्रपट चालण्यासाठी केवळ उत्तम आशय असून भागणार नाही, तर तो देशभरातील प्रेक्षकांबरोबरच परदेशांतही विविध ठिकाणी पोहोचवावा लागेल, जेणेकरून भारतीय चित्रपट व्यवसायाचे क्षितिज रुंदावेल’ असे मत ‘स्त्री’, ‘छावा’ सारखे सुपरहिट चित्रपट देणारे निर्माते दिनेश विजन यांनी व्यक्त केले. …अधिक वाचा
22:04 (IST) 2 May 2025

म्हाडाच्या तिजोरीत वर्षभरात ३२२०.६३ कोटींची भर, ३९.६९ टक्क्यांनी महसुलात वाढ

महसूल ८,११३.८८ कोटींवरुन थेट ११,३३४.५१ कोटींवर …वाचा सविस्तर
21:51 (IST) 2 May 2025

अंधेरीमधील मोगरा नाल्यात प्रथमच फ्लेमिंगोंची हजेरी

पहाटेच्या सुमारास मोगरा नाल्यात फ्लेमिंगोंचे दर्शन घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, लेसर फ्लेमिंगो सामान्यतः खाऱ्या पाण्याच्या तलावांमध्ये आणि पाणथळ जागांमध्ये आढळतात. …सविस्तर वाचा
21:05 (IST) 2 May 2025

वन ई-सेवा केंद्र; ताडोबा बफरमधील गावे आता ‘टेक्नोसावी’

ताडोबाच्या बफर भागातील अनेक गावांमध्ये या सुविधांचा अभाव आहे, ज्यामुळे ग्रामस्थांना अशा सेवा मिळविण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. …सविस्तर वाचा
20:46 (IST) 2 May 2025

अल्पभूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीची संधी, २०० कोटींच्या कृषी यांत्रिकीकरण अभियानाला मंजुरी

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या या योजनेत केंद्राचा ६० टक्के आणि राज्याचा ४० टक्के वाटा असणार आहे. …सविस्तर वाचा
20:41 (IST) 2 May 2025

वाहने भाड्याने देण्याच्या नावाखाली १३७५ जणांची २०कोटी ६० लाखांची फसवणूक, काशिमिरा पोलिसांकडून आरोपींना अटक ; २४६ वाहने जप्त

मुख्य आरोपी सुरेश कांदळकर व साथीदार सचिन तेटगुरे अशी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून २४६ वाहने जप्त करण्यात आली आहे. …सविस्तर वाचा
20:36 (IST) 2 May 2025

अभिनेत्री छाया कदम यांना वनखात्याचा नोटीसरुपी ‘बुलावा’

सोमवार, पाच मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता छाया कदम यांना मुंबई येथील वनविभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे. …अधिक वाचा
20:27 (IST) 2 May 2025

कृषिमंत्र्यांची रासायनिक खत कंपन्यांना तंबी, खरीप हंगामात खतांसोबत लिंकिंग केल्यास फौजदारी कारवाई

खत उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी यापुढे कोणत्याही स्वरूपात लिंकिंग न करण्याची ग्वाही विक्रेत्यांच्या संघटनेला आणि सरकारच्या प्रतिनिधींना दिल्यामुळे महाराष्ट्र खते, कीटकनाशके, बियाणे विक्रेते संघटनेने (माफदा) खत खरेदी बंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. …सविस्तर वाचा
20:21 (IST) 2 May 2025

उष्म्यात वाढ असताना शनिवारपासून अवकाळीची शक्यता

शनिवार ते मंगळवार या कालावधीत वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. …सविस्तर वाचा
20:18 (IST) 2 May 2025

अकोला पुन्हा एकदा सर्वाधिक ‘हॉट’, पावसाचाही अंदाज…

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ३ व ४ मे रोजी पऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. …वाचा सविस्तर
20:12 (IST) 2 May 2025

आयुष उपचारांचा लवकरच ‘आयुष्मान भारत कार्ड’मध्ये समावेश

केंद्र सरकार आरोग्य योजना आणि विमा संरक्षणामध्ये आयुष उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. …सविस्तर बातमी
19:59 (IST) 2 May 2025

चित्रपटगृहे वाढवण्यासाठी अधिक गुंतवणूक व्हायला हवी – आमिर खान

सिनेमाप्रेमींचा देश असूनही एकूण लोकसंख्येपैकी केवळ २ टक्के लोक चित्रपटगृहात येऊन चित्रपट पाहतात, अशी खंत अभिनेता आमिर खान याने व्यक्त केली. …वाचा सविस्तर
19:50 (IST) 2 May 2025

तीव्र उन्हाळ्यामुळे जेजुरीतील खंडोबा गड सुनासुना , भाविकांची संख्या घटली

जेजुरीच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. …सविस्तर वाचा
19:48 (IST) 2 May 2025

नागपूर मेट्रो स्टेशनला आग, सेवा ठप्प; चौकशीचे आदेश

स्थानकावरील सौर पॅनलमध्ये शॉर्ट सक्रिट झाल्याने आग लागल्याचे महामेट्रोकडून सागण्यात आले. …वाचा सविस्तर
19:27 (IST) 2 May 2025

मर्डर मिस्ट्री! …अखेर ‘त्या’ हत्येचा उलगडा, मुलाने वडिलांची…

चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील मर्डर मिस्ट्रीच्या थरारपटाचा २ मे रोजी उलगडा झाला. …वाचा सविस्तर
18:12 (IST) 2 May 2025

रेल्वे रुळावर ठेवल्या लाकडी पेट्या…मोटरमनच्या सतर्कतेमुळे घातपाताचा प्रयत्न निष्फळ

खोडसाळपणे रुळावर या लाकडी पेट्या ठेवण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. …सविस्तर वाचा
17:50 (IST) 2 May 2025

रखरखत्या उन्हात जपले रक्ताचे नाते! ४०० रक्तदात्यांच्या सहभागाने रक्तटंचाईवर मात…

स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. …वाचा सविस्तर
17:38 (IST) 2 May 2025

कर्जमाफीसाठी ट्रॅक्टरसह हजारो शेतकऱ्यांची धडक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच शिदोरी उघडून…

कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. …सविस्तर बातमी
17:29 (IST) 2 May 2025

धरणात आंघोळीला गेलेले दोन तरुण बुडाले, आता धरणाचे द्वार बंद करून….

प्रशांत नरेश पटले (२१) रा.गोर्रे ता.सालेकसा आणि प्रतीक दौलत बिसेन (२१) रा.गोर्रे ता.सालेकसा जिल्हा गोंदिया असे त्यांची नावे आहेत. …सविस्तर बातमी
17:27 (IST) 2 May 2025

अंधेरीत दुचाकीची बेस्ट बसला धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी

मुंबई : अंधेरी येथे शुक्रवारी सकाळी ९.२० च्या सुमारास बेस्ट उपक्रमातील कंत्राटी बसगाडीला दुचाकीने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अंधेरी येथील आगरकर चौकातून महाकाली गुहेकडे जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील मातेश्वरी ट्रॅव्हल्स कंपनीच्या भाडेतत्त्वावरील बसला नेल्को सिग्नल जवळ अचानक एका दुचाकीने धडक दिली. दुचाकी पाठीमागून बसवर आदळली आणि दुचाकीस्वार इस्माईल सुरतवाला खाली कोसळला. बसचे उजव्या बाजूचे मागचे चाक त्याच्या डाव्या हातावरून गेले आणि तो गंभीर जखमी झाला.

मोहम्मद अली रोडवर परिसरात वास्तव्यास असलेल्या सुरतवाला यांना तात्काळ अंधेरी येथील होली स्पिरिट रुग्णालयात दाखल करण्यात आले. हाताला झालेल्या दुखापतीमुळे त्यांची प्रकृती गंभीर आहे. तसेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून पोलीस परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासत आहेत.

17:16 (IST) 2 May 2025

एनएचएमच्या कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारला इशारा, वेतन न दिल्यास १४ मेपासून आमरण उपोषण

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) राज्यात कार्यरत असलेले ३४ हजार ५०० कर्मचारी मागील चार महिन्यांपासून विनावेतन काम करीत आहेत. …वाचा सविस्तर
16:59 (IST) 2 May 2025

जागतिक वारसा यादीत शिवनेरी, रायगडसह १२ किल्ल्यांंच्या समावेशाची शिफारस

भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाने जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील शिवनेरी, रायगडसह ११ किल्ले आणि तामिळनाडूमधील जिंजी अशा १२ किल्ल्यांचा समावेश करण्याची शिफारस केली आहे …सविस्तर वाचा
16:59 (IST) 2 May 2025

ई-बाईक टॅक्सी बंद करा…रिक्षा संघटना आक्रमक

बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली राज्य सरकारने ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. …अधिक वाचा
16:32 (IST) 2 May 2025

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

पालघर जिल्हा रुग्णांना स्थानिक पातळीवरच मिळणार आर्थिक मदतीसाठी मार्गदर्शन …अधिक वाचा
16:28 (IST) 2 May 2025

मानवतेचा सुखद ओलावा! गावकऱ्यांची तहान भागविण्यासाठी पिकांवर पाणी सोडले…

ही तहान भागवण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले असताना गावातील दानशूर, कर्तव्यनिष्ठ माणसांनी आपल्या शेतातील विहिरी गावासाठी खुल्या करून नागरिकांची तहान भागवत आहे. …वाचा सविस्तर
16:18 (IST) 2 May 2025

शेकडो ट्रॅक्टरसह ठाकरेंच्या शिवसेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक! बुलढाण्यात वाहतूक विस्कळीत…

आज शुक्रवारी, २ मे दुपारी अडीच वाजताच्या सुमारास रणरणत्या उन्हात काढण्यात आलेला हा मोर्चा ठाकरेंच्या शिवसेनेचे जंगी शक्ती प्रदर्शन ठरले. …सविस्तर बातमी
16:11 (IST) 2 May 2025

मोदी सरकारचे जाहीर आभार, काँग्रेसचा…

केंद्र सरकारच्या जातीनिहाय जनगणना करण्याच्या लोककल्याणकारी निर्णयाचे भारतीय जनता पार्टी बुलढाणा तालुक्याच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच मोदी सरकारला धन्यवाद देण्यात आले, आभार मानण्यात आले. …सविस्तर वाचा
15:59 (IST) 2 May 2025

मेळघाटात आणखी एका कोळी प्रजातीचा शोध, ‘हायब्रोसिस्टम चिखलदरेंसीस’…

या संशोधनाने मेळघाटातील जैवविविधतेच्या संपत्तीला नव्याने अधोरेखित केले आहे. …सविस्तर वाचा
15:24 (IST) 2 May 2025

पंतप्रधान मोदी, मोहन भागवतांची भेट झाली आणि….जातीनिहाय जनगणनेवर संघाच्या बदललेल्या भूमिकेमागे…

केंद्र सरकारच्या या निर्णयावर सध्या सर्वत्र विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात असताना जातीनिहाय जनगणनेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. विशेष म्हणजे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. …सविस्तर बातमी

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे