Mumbai Pune Nagpur Breaking News Updates Today 02 May 2025 : केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व भाजपात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्याची आठवण भाजपाला करून दिली आहे. तसेच महिला मंत्र्याला अश्लील संदेश पाठवणाऱ्या २५ वर्षीय तरुणाला नोडल सायबर पोलिसांनी पुण्यातून अटक केली. अमोल काळे असे या आरोपीचे नाव असून तो महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. या बातम्यांसह राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्या या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून सविस्तर जाणून घ्या.

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 02 May 2025

14:48 (IST) 2 May 2025

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, दोन निवडणूक याचिका….

केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या या विजयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी मोठा निर्णय दिला आहे. …वाचा सविस्तर
14:30 (IST) 2 May 2025

अक्षय तृतीयानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण… हे आहे आजचे दर…

अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचे दर पूर्वीच्या तुलनेत घसरले होते. परंतु हे दर वाढण्याचे संकेत सराफा व्यवसायिकांकडून दिले जात असल्याने ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात सोने- चांदीच्या दागिन्याची खरेदी केली गेली. परंतु अक्षय तृतीयाच्या दोन दिवसानंतरच सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली दिसत आहे. …सविस्तर वाचा
13:40 (IST) 2 May 2025

तोतया पोलिसांनी पळवले पंचवीस लाख रुपये…पुण्यातील व्यवसायिकांना चेंबूरमध्ये लुटले…

पुणे येथून मुंबईत आलेल्या दोन व्यवसायिकांना पोलीस असल्याची बतावणी करून पाच – सहा जणांनी पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून पंचवीस लाख रुपये पळवल्याची घटना बुधवारी चेंबूर परिसरात घडली …वाचा सविस्तर
13:27 (IST) 2 May 2025

तोट्यातील बेस्टला आणखी आर्थिक भार नको, उच्च न्यायालयाचा बेस्टला दिलासा

अन्याय्य कामगार पद्धतीचा आरोप करून बेस्ट कामगार संघटनेने या प्रकरणी औद्योगिक न्यायालयात तक्रार दाखल केली होती. …अधिक वाचा
13:16 (IST) 2 May 2025

कर्करोग दोन मिनिटांत रोखता येणार… आरशात पाहून निदान…

भारतीयांमध्ये डोके आणि मानेचा कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोग आहे. त्यात तोंडाची पोकळी, ओरोफॅरिन्क्स, हायपोफॅरिन्क्स, नासोफॅरिन्क्स आणि स्वरयंत्रातील कर्करोगांचा समावेश आहे. …वाचा सविस्तर
12:00 (IST) 2 May 2025

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्याकडून गडकरींचा ‘ त्या’ वक्तव्याची आठवण

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बावनकुळे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्त्यांची आठवण करून दिली. ते म्हणाले, जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. …सविस्तर वाचा
11:22 (IST) 2 May 2025

अमली पदार्थ तस्करांकडून ६४ किलो गांजा जप्त, ओदिशा, धुळ्याहून गांजाची तस्करी

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत १३ लाख २८ हजारांचा ६४ किलो गांजा जप्त करण्यात आला. ओदिशा आणि धुळ्यातून पुणे शहरात गांजा विक्रीसाठी पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले. …वाचा सविस्तर
11:06 (IST) 2 May 2025

लिकिंगने वाढविला कृषी विक्रेत्यांचा ताप, महाराष्ट्रात रासायनिक खतांची खरेदी बंद

दरम्यान या संदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मुंबईत एक महत्वाची बैठक बोलावली आहे. …अधिक वाचा
10:56 (IST) 2 May 2025

क्रीडा विभागासाठी नवे धोरण; तरण तलावातील मुलाच्या मृत्यूच्या घटनेनंतर प्रशासनाचा निर्णय 

अलीकडेच, कंत्राटदाराच्या ताब्यात असलेल्या क्रीडा संकुलातील तरण तलावात नऊ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. …वाचा सविस्तर
10:38 (IST) 2 May 2025

जपानच्या आंब्याला पुणेरी गोडवा! दौंड मधील वरवंडच्या मातीत मियाझाकी आंबा पिकवलाय पुणेकर शेतकऱ्याने

परदेशातील जवळपास 90 आणि आपल्या येथील 30 अशी एकूण 120 आंब्याच्या झाडांची लागवड केवळ 20 गुंठयात पुण्यातील वरवंड भागातील फारूक इनामदार या शेतकर्‍यांनी केली आहे यामध्ये जपान येथील मियाझाकी या आंब्याची लागवड करण्यात आली असून तो जपान येथे 2 लाख 70 हजार रुपये किलोमध्ये मिळतो. …सविस्तर बातमी
10:27 (IST) 2 May 2025

महिला मंत्र्याला संदेश पाठवून त्रास देणाऱ्याला पुण्यातून अटक

नोडल सायबर पोलिसांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने भोसरी परिसरातून अमोल काळे (२५) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच महिला मंत्र्याला यांना संदेश पाठवून त्रास दिल्याची कबुली दिली. …सविस्तर बातमी
09:57 (IST) 2 May 2025

एप्रिल २०२६ मध्ये सेवानिवृत्त होत आहात ? मग हे वाचाच

एप्रिल २०२६ मध्ये निवृत्त होणाऱ्या मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांना ही सूचना आहे. संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे एप्रिल – मे २०२५ या कालावधीत वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण आयोजित केल्या जात आहे. या प्रशिक्षणासाठी सध्या ऑनलाईन नावं नोंदणी प्रक्रिया २१ एप्रिलपासून सूरू करण्यात आली. …सविस्तर बातमी
09:42 (IST) 2 May 2025

नागपूर पोलिसांकडे ३४ कोटीची कर थकबाकी

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला सुरक्षा देण्यासाठी लाखो रुपये घेणारे नागपूर शहर पोलीस कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर आली आहे. …अधिक वाचा
09:32 (IST) 2 May 2025

भाडेतत्त्वावरील बसमुळे तूट, महापालिकेने बेस्ट उपक्रमाला दिलेला कृती आराखडा अपयशी

बेस्टला आर्थिक तुटवड्यातून बाहेर काढण्यासाठी २०१९ मध्ये मुंबई महापालिका प्रशासनाने बेस्ट उपक्रमाला एक कृती आराखडा दिला होता. भाडेतत्त्वावर बस घेतल्या, तरी तूट भरून निघाली नाही, हे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा आराखडा अपयशी ठरल्याची चर्चा सुरू आहे. …सविस्तर वाचा
09:23 (IST) 2 May 2025

अंधेरीत बॉम्ब… धमकी आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क…

मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातील महिला पोलीस शिपायाने दूरध्वनी उचलला. …सविस्तर वाचा
09:12 (IST) 2 May 2025

जि.प. निवडणुकांबाबत अनिश्चिता, तरीही भाजपचा पक्षफोडीवर भर

ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या. त्या कधी होणार याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. …सविस्तर वाचा
09:01 (IST) 2 May 2025

वसई विरार मध्ये आता टीओडी स्मार्ट मीटर, आतापर्यंत ६४ हजार स्मार्ट मीटर लावले

महावितरणच्या वसई मंडळाच्या अंतर्गत शहरात घरगुती, व्यावसायिक, शासकीय, औद्योगिक अशा विविध साडे दहा लाख वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. …वाचा सविस्तर
08:26 (IST) 2 May 2025

जातनिहाय जनगणना: भाजप मोदींच्या अभिनंदनाचे ठराव राज्यभर घेणार, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची घोषणा

देशात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व आर्थिक उत्क्रांतीचे नवे पर्व जातनिहाय जनगणनेमुळे सुरू होईल.

सविस्तर वाचा…

08:25 (IST) 2 May 2025

यूट्यूब’ची भारतीय निर्मात्यांसाठी ८५० कोटींची गुंतवणूक

वांद्रे कुर्ला संकुलातील ‘जिओ’ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटरमध्ये गुरुवारपासून सुरू झालेल्या ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अॅण्ड एंटरटेनमेन्ट समिट’ (वेव्ह्ज) सोहळ्यातील एका परिसंवादात नील मोहन हे सहभागी झाले होते

सविस्तर वाचा...

08:24 (IST) 2 May 2025

सराइताकडून भर चौकात महिलेचा विनयभंग, विश्रांतवाडी पोलिसांकडून सराइतासह साथीदारांवर गुन्हा

याप्रकरणी सराइत गुन्हेगार संकेत सावंत (रा. कळस, आळंदी रस्ता, विश्रांतवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे