Mumbai Breaking News Updates: पुण्यातील वैष्णवी आत्महत्या प्रकरणी अद्यापही राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे याला अटक झालेले नाही. पोलिसांची सहा पथक दोघांचा शोध घेत आहेत. दरम्यान, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पळवून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून गेल्या अडीच तासांपासून सुनील चांदिरे नावाच्या व्यक्तीची कसून पोलीस चौकशी सुरू आहे. 

तसेच राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याचबरोबर पूर्व-मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. यावेळी काही भागांत १०० ते १५० मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यात मान्सूनपूर्व खबरदारी घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महापालिकांना आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत, तेव्हा मुंबई, पुणे आणि नागपूर सह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल…

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 22 may 2025

17:12 (IST) 22 May 2025

इगतपुरी येथे कुशीनगर एक्सप्रेसमध्ये बनावट तिकीट तपासणीसाला अटक

कुशीनगर एक्सप्रेसमध्ये तिकीट तपासणीसारखा पेहराव करून एक बनावट तिकीट तपासणीस प्रवाशांची तिकिटे तपासत होता. …वाचा सविस्तर
17:04 (IST) 22 May 2025

पालकमंत्रीपदावरून वाद वाढवू नका – भुजबळ यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. …वाचा सविस्तर
17:02 (IST) 22 May 2025

पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट, पुणे वेध शाळेचा इशारा

आज दिनांक 22/05/2025 रोजी पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला असून पुढील ३ ते ४ तासांत जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे.

16:59 (IST) 22 May 2025

राज्यभरात २२ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या, मुंबईत तीन नवे उपायुक्त

राज्यात इतरत्र कार्यरत असलेल्या तीन उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबईत करण्यात आल्या आहेत. …सविस्तर बातमी
16:45 (IST) 22 May 2025

‘बसवराजू’च्या मृत्यूनंतर नक्षलवादाचा कणा मोडला का? नवीन म्होरक्या कोण? 

बसवराजूने नक्षल चळवळीतील सर्वाधिक काळ छत्तीसगड, आंध्र प्रदेश तेलंगणा, झारखंड आणि महाराष्ट्रात घालवला. ५०० हून अधिक जवानांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या बसवराजूने ९० च्या दशकात चळवळीत मोठ्या प्रमाणात आदिवासी तरुणांना भरती केले. …सविस्तर बातमी
16:33 (IST) 22 May 2025

ग्राहकाकडे निर्मित हरित ऊर्जा इतरत्र वापराला आडकाठी…महावितरणकडून…

केंद्र व राज्य शासनाकडून हरित ऊर्जेला प्रोत्साहन दिले जाते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने १९ नोव्हेंबर २०२४ मध्ये महावितरणला ग्रुप नेट मिटरिंगचा आदेश दिला. …सविस्तर वाचा
16:28 (IST) 22 May 2025

लाच प्रकरणी महिला तलाठीसह मंडळ अधिकारी ताब्यात

इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …वाचा सविस्तर
16:18 (IST) 22 May 2025

कल्याणमधील इमारत दुर्घटनेतील रहिवाशांची पुनर्वसनाची मागणी

या इमारतीमधील सहा कुटुंबीयांच्या घरात अंत्येष्टीचे विधी आहेत. तरीही हे रहिवासी शोकाकुल अवस्थेत पालिकेत आले आहेत. …अधिक वाचा
16:17 (IST) 22 May 2025

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, विदर्भातील ८६ हजार हेक्टर झुडपी जंगल वनक्षेत्र घोषित….

राज्य शासनाने विदर्भातील ८६ हजार हेक्टर भूमीला ‘डिनोटिफाय’ करण्याचा निर्णय घेतला होता. …सविस्तर वाचा
16:08 (IST) 22 May 2025

जिल्ह्यात दोन बालविवाह रोखण्यात यश, ग्राम बाल विकास समितीची सजगता

स्थानिक पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या ग्राम बाल विकास समितीच्या सजगतेमुळे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर येथील दोन बालविवाह रोखण्यात महिला व बाल कल्याण विभागाला यश आले. …सविस्तर वाचा
15:54 (IST) 22 May 2025

पुणे: वैष्णवीच्या आरोपींना पोलीस काही तासात बेड्या ठोकतील – मंत्री उदय सामंत

पिंपरी-चिंचवडमध्ये वैष्णवीवर झालेल्या अमानवी घटनेने खळबळ उडवली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सहा पथके रवाना केली असून, काही तासांत अटक केली जाईल, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. …वाचा सविस्तर
15:54 (IST) 22 May 2025

अभिनेता सलमान खानच्या इमारतीतून खारमधील मॉडेल ताब्यात, दोन दिवसांतील दुसरी घटना

एका मॉडेलला सलमानच्या घराजवळून पोलिसांनी ताब्यात घेतले. ही तरूणी सलमानच्या घरात शिरण्याच्या प्रयत्नात होती. …वाचा सविस्तर
15:21 (IST) 22 May 2025

अपहरण, खंडणी प्रकरणातील फरार आरोपी ताब्यात

शहर परिसरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर १० गुन्हे दाखल आहेत. …सविस्तर वाचा
14:42 (IST) 22 May 2025

पुणे: वैष्णवी मृत्यू प्रकरणी अजित पवार संतापले!; म्हणाले, ” ‘त्या’ भ**ना सोडणार नाही..”

पिंपरी-चिंचवडमध्ये वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “त्या दोषींना सोडणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला असून लवकरात लवकर अटक होईल, असंही सांगितलं. …वाचा सविस्तर
14:15 (IST) 22 May 2025

Malshej Ghat Landslide : माळशेज घाटात दरड कोसळली, एक मार्गिका सुरू, दरड हटवण्याचे कामही वेगाने

पुणे, अहिल्यानगर यांच्यासह मुंबई, ठाणे, नाशिक जिल्ह्यांसाठी महत्वाचा असलेल्या कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर माळशेज घाट महत्वाचा आहे. …अधिक वाचा
13:47 (IST) 22 May 2025

उल्हासनगरमधील अकरा जणांची दरोडा आणि मकोका आरोपातून सुटका

मागील दहा वर्षापूर्वी उल्हासनगर शहरात घडलेल्या एका दरोडा प्रकरणाचा खटला विशेष मकोका न्यायालयासमोर सुरू होता. …सविस्तर बातमी
13:17 (IST) 22 May 2025

मुसळधार पावसातही टँकरच्या फेऱ्या, ६५३ गाव-वाड्यांची टँकरवर मदार

जिल्ह्यातील सुमारे तीन लाख लोक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. …अधिक वाचा
13:15 (IST) 22 May 2025

अभिनेता सलमान खानच्या इमारतीत शिरलेला संशयीत तरूण पोलिसांच्या ताब्यात

अभिनेता सलमान खानच्या इमारतीत शिरलेल्या तरूणाला पोलिसानी ताब्यात घेतले. सुरक्षा रक्षक व पोलिसांची नजर चुकवून आरोपी इमारतीत शिरला होता. …सविस्तर बातमी
12:53 (IST) 22 May 2025

अखेर पुनावळेतील कचरा डेपाेचे आरक्षण रद्द, नागरिकांच्या विरोधाला यश; आता ‘कन्व्हेन्शन सेंटर’चे आरक्षण

या जागी व्यावसायिक गाळे, कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचे आरक्षण नवीन विकास आराखड्यात टाकण्यात आले आहे. …अधिक वाचा
12:52 (IST) 22 May 2025

अखेरचा हंगाम मच्छीमारांसाठी नुकसानदायक! अनेक मच्छीमारांवर कर्जबाजारी होण्याची वेळ

येत्या ३१ मेनंतर दोन महिन्यांसाठी मासेमारीवर बंदी असणार आहे. त्यामुळे अखेरच्या हंगामात मासळी गोळा करून आर्थिक साठा करण्याचा प्रयत्न मच्छीमार करत होते. …वाचा सविस्तर
12:43 (IST) 22 May 2025

धुळ्यातील विश्रामगृहात एक कोटी ८४ लाख रुपयांचे घबाड, एकनाथ शिंदे यांच्या आमदारावर ठाकरे गटाचा आरोप

ही खोली विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार अर्जुन खोतकर यांचे खासगी स्वीय सहायक किशोर पाटील यांच्या नावाने १५ मे पासून आरक्षित असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. …वाचा सविस्तर
12:23 (IST) 22 May 2025

१० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेत अडकला धातूचा तुकडा, वाडिया रुग्णालयामध्ये बाळावर यशस्वी उपचार

बालरोग ईएनटी तज्ज्ञ डॉ. बालगोपाल कुरूप यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने बाळावर एसोफॅगोस्कोपी (अन्ननलिकेची एंडोस्कोपी) करून त्याच्या अन्ननलिकेत अडकलेला धातूचा तुकडा बाहेर काढला. …सविस्तर बातमी
12:20 (IST) 22 May 2025

धक्कादायक! ‘बीडीएस’च्या विद्यार्थिनीची आत्महत्या; परीक्षेत कमी गुण मिळाल्याने…

गायत्री सतीश काळे (२५) रा. विश्रामगृहाजवळ रुईकरवाडी, यवतमाळ असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेने यवतमाळ येथे खळबळ उडाली आहे. …अधिक वाचा
12:17 (IST) 22 May 2025

टेलिग्रामवरून समलिंगी संबंध ठेवणे पडले महागात, अश्लील चित्रफित तयार करून ४१ हजारांना लुटले

याप्रकऱणी मेघवाडी पोलिसांनी ४ जणांना अटक केली. …वाचा सविस्तर
12:05 (IST) 22 May 2025

एमएचटी सीईटीच्या अभियांत्रिकी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना हरकती नोंदवता येणार

यामुळे चुकीचा प्रश्न किंवा पर्याय याबाबत विद्यार्थ्यांची शंका दूर होण्यास मदत होणार आहे. …सविस्तर वाचा
12:02 (IST) 22 May 2025

जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, जातवैधता कसे काढतात? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर वाचा…

आरक्षित जागांवर शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतला किंवा नोकरी मिळवली तर जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बांधकारक असते. …सविस्तर वाचा
11:49 (IST) 22 May 2025

‘झोपु’ची सक्ती झालेल्या वरळीतील गृहनिर्माण संस्थांना फक्त ३५ टक्के अतिरिक्त क्षेत्रफळ!

या गृहनिर्माण संस्थांनी समूह पुनर्विकासाचा मार्ग अवलंबिला असता तर दुप्पट अतिरिक्त क्षेत्रफळाचा लाभ मिळाला असता. …अधिक वाचा
11:30 (IST) 22 May 2025

तरुण सेस्कटॉर्शनच्या जाळ्यात; खंडणीस नकार दिल्याने अश्लील चित्रफित इन्स्टाग्रामवर

मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढण्यात आले असून त्याची अश्लील चित्रफित तयार करून ३० हजारांची खंडणी मागण्यात आली होती. …अधिक वाचा
11:30 (IST) 22 May 2025

अकरावीचे वर्ग १ जुलै रोजी भरणार, शिक्षण संचालनालयाकडून शाळा व्यवस्थापनाला मुभा

शालेय शिक्षण विभागाने ६ मे २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार यंदा राज्यातील अकरावीचे वर्ग ११ ऑगस्टपासून सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. …सविस्तर वाचा
11:26 (IST) 22 May 2025

मुंबईकरांची कुचंबणा…, ८६ जणांसाठी एक शौचालय, मुंबईतील सार्वजनिक शौचालयांच्या बांधणीची कूर्मगती

शौचालयांची संख्या वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेला प्रकल्प कूर्मगतीने सुरू असल्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत शौचालयांची संख्या वाढलेली नाही. …वाचा सविस्तर

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे