Today Pune News Live Updates 30 may 2025: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाणला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून निलेश चव्हाण हा फरार होता. अखेर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी त्याला शोधून काढलं आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या चुलत्यांसह इतरांना धमकावणाऱ्या आणि इतर आरोप असणारा निलेश चव्हाण फरार होता. गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी- चिंचवड पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी त्याला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत.
या बातमीसह मुंबई, मुंबई महानगर, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूरमधील विविध ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून मिळेल…
Live Updates
Latest Live News Updates, 30 may 2025
बनावट, निकृष्ट दर्जा, बियाण्यांच्या अडचणीवर आता ‘महाबीज साथी’; जाणून घ्या नेमका लाभ काय?; एका क्लिकवर बीज…
गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांना बनावट, निकृष्ट दर्जाच्या किंवा वेळेवर न मिळालेल्या बियाण्यांमुळे प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले आहे. …अधिक वाचा
जेएन.१ ची दोन लक्षणे करोनाच्या अन्य प्रकारांपेक्षा भिन्न
ही लक्षणे दिसताच तातडीने निदान करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. …सविस्तर बातमी
करोना झाला की अन्य संसर्गजन्य आजार…, लक्षण साधर्म्यामुळे निदान करण्याचे डॉक्टरांपुढे आव्हान
करोना आणि अन्य संसर्गजन्य आजारांची लक्षणे बहुतांशी सारखीच असल्याने सध्या सर्दी, खोकला, ताप अशा अनेक लक्षणांमुळे डॉक्टरांना करोना ओळखणे थोडे अवघड झाले आहे. …सविस्तर बातमी
भायखळ्यातील इमारत दुर्घटनेतील जखमी महिलेचा मृत्यू
गंभीर जखमी असलेल्या नाजिया खान (३५) यांची गुरुवारी मध्यरात्री २ च्या सुमारास उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. …सविस्तर बातमी
शिळफाटा रस्त्यावरील काटई, उड्डाण पूल जून अखेरपर्यंत खुला
रहदारीसाठी महत्वाचा असलेला हा पूल येत्या महिन्याच्या जून अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी दिली. …सविस्तर बातमी
उरणमध्ये विजेचा लपंडाव, त्रस्त नागरिकांचा महावितरणविरोधात संताप
महावितरणकडून देखभाल दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद करूनही वारंवार खंडित होणाऱ्या विद्युतपुरवठ्यामुळे उरण पूर्व विभागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. …अधिक वाचा
७५ वर्षीय जन्मदात्या बापाला मुलांनी सोडलं बेवारस!; “मुलांनो ‘तो’ वाट पाहतोय…”
निवृत्ती शिवराम गायकवाड हे ७५ वर्षाचे आहेत. त्यांचं पुण्यातील आंबेगावात कुटुंब राहतं, ते स्वतः तिथेच कुटूंबासोबत राहत होते. पण, मुलांनी त्यांना आळंदीत बेवारस सोडून दिले आहे. …सविस्तर बातमी
डोंबिवलीत मोठागाव रेतीबंंदर येथे वाळू तस्करांची १२ लाखाची रेती पाण्यात, डोंबिवली महसूल विभागाची कारवाई
वाळू तस्करांच्या किनारी उभ्या करून ठेवण्यात आलेल्या सामानाची, वाळू साठा हौदांची तोडमोड करण्यात आली. …सविस्तर बातमी
उरणच्या रानसई धरणाच्या पाणीपातळीत वाढ; दोन दिवसाची पाणीकपात मात्र कायम
सोमवार पासून उरणच्या रानसई धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ११६ फूट उंचीच्या धरणात मे महिन्यात अवघे ९० फुटांवर पाणी होते. …अधिक वाचा
नामांकित कंपन्यांचे स्कॉच मद्य जप्त; तिघे अटकेत, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
या कारवाईत ३५२ सीलबंद बाटल्यांसह दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहे. …वाचा सविस्तर
VIDEO: एनडीएतील महिलांची पहिली तुकडी उत्तीर्ण; पुशअप्स मारून साजरा केला आनंद
पहिल्या तुकडीतील १७ छात्रांंनी दीक्षांत संचलनानंतर पुशअप्स मारून आनंद साजरा केला. …सविस्तर वाचा
नागपूरची सुनीता जामगडे पाकिस्तानी हेर?
नागपूर येथील रहिवासी सुनीता जामगडे प्रकरणी नवीन माहिती उघडकीस आली आहे, ती कामाच्या शोधात पाकिस्तानी नागरिकांच्या संपर्कात होती. …अधिक वाचा
खारेगाव पूलाच्या दुरुस्ती कामामुळे मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहनांच्या रांगा
या दुरुस्ती कामामुळे मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा, डोंबिवली येथून ठाणे, भिवंडीच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. …वाचा सविस्तर
पावसामुळे रस्ते गाळात, उपसलेला गाळ नाल्यांकाठी कायम; शहरात अनारोग्याची भीती
गोवंडी-मानखुर्द परिसरात अस्वच्छता पसरली असून त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. …सविस्तर बातमी
या शाळांत एकही शिक्षक राहणार नाही, राज्यभरातील शिक्षकांची वाट बिकट
नव्या पद्धतीने संचमान्यता व त्यानुसार शिक्षक नियुक्ती यांस शिक्षण संचालकांनी तूर्तास स्थगिती दिली आहे. मात्र त्यापूर्वी किती शाळा विना शिक्षक होणार याचा आढावा घेतला होता. …वाचा सविस्तर
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची बियाण्यांसाठी तेलंगणात गर्दी
खरीप हंगामात जिल्ह्यात चोर बिटीच्या माध्यमातून ग्रामीण भागात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू आहे. …सविस्तर वाचा
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची बियाण्यांसाठी तेलंगणात गर्दी
खरीप हंगामात जिल्ह्यात चोर बिटीच्या माध्यमातून ग्रामीण भागात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू आहे. …सविस्तर वाचा
VIDEO: रानटी हत्तींचा चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश, सिंदेवाही परिसरात दहशत…
कळमगाव गन्ना कुकडहेटी गावातून रानटी हत्तीने आगमन झाल्याने काही काळ कुतूहल वाटले असले तरी हत्तीने नागरिकांचा पाठलाग केल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले आहे . …अधिक वाचा
उत्तन ते वसई सागरी सेतू मार्ग बदलण्याची मागणी; परिवहन मंत्र्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
वर्सोवा ते विरारसाठी तयार केल्या जाणाऱ्या सागरी सेतू मार्गातील उत्तन ते वसई दरम्यानच्या मार्गात बदल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. …सविस्तर बातमी
महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयावरील खर्च पाण्यात..; प्रादेशिक संचालकांना अधिकार…
माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणच्या कामांचे विकेंद्रीकरण करण्यासाठी राज्यात महावितरणचे चार प्रादेशिक कार्यालय कार्यान्वित केले. …वाचा सविस्तर
पालिकेची वृक्ष गणना रखडली; निविदा प्रक्रियेलाही प्रतिसाद नाही
वृक्षांची स्थिती माहीत व्हावी यासाठी दर पाच वर्षांनी वृक्ष गणना केली जाते. मात्र २०१६ नंतर वसई विरार शहरातील वृक्षांची गणनाच झाली नसल्याचे समोर आले. …वाचा सविस्तर
‘आयटी’ची नोकरी सोडून ओमला नौदलात अधिकारी होण्याची ओढ
पुढील महिन्यात तो भारतीय नौदल प्रबोधिनीत प्रशिक्षणासाठी दाखल होत आहे. …वाचा सविस्तर
Monsoon Rain Updates: मुसळधार पावसाला “ब्रेक” लागणार..!
मे महिन्यातच धडकलेल्या मोसमी पावसाबाबत बाबत तज्ज्ञाकडून शंका वर्तवली जात असताना राज्यात मात्र पावसाला “ब्रेक” लागणार आहे. …सविस्तर बातमी
वाढत्या गुन्हेगारीने नाशिककर त्रस्त, हाॅटेल जाळपोळीचा प्रयत्न
अनेक घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग दिसत असून बालगुन्हेगारीने डोके वर काढल्याचे चित्र आहे. …सविस्तर वाचा
मुंबई विमानतळावर पावणेसात कोटींच्या कोकेनसह परदेशी नागरिकाला अटकेत
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तवार्ता विभागाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत सुमारे ६७४ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. …सविस्तर वाचा
चक्क अंथरुणावरच कोब्रा, उशीखाली दडला होता
पावसाळा सुरू झाला की, सरपटणाऱ्या प्राण्याचे दर्शन कुठेही घडते. विशेषत: साप त्याच्या बिळात पाणी शिरल्याने आसरा शोधत असतो. अशा वेळी जेथे जागा मिळेत तेथे तो जातो. …वाचा सविस्तर
Torres fraud case : गैरव्यवहारातून १७७ कोटींची कमाई टोरेस गैरव्यवहार प्रकरण; ईडीकडून आरोपपत्र दाखल
टोरेस गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या तपासात फरार परदेशी नागरिकांनी गैरव्यवहारातून कमावलेले १७७ कोटी ११ लाख रुपये व्यवहारात आणल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. …वाचा सविस्तर
शहरात विविध ठिकाणच्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग; कचरा उचलण्याकडे पालिकेची पाठ
वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात वृक्ष छाटणी करण्याची कामे सुरू आहेत. मात्र छाटणीनंतर निघणाऱ्या फांद्या व अन्य पाळा पाचोळा हा कचरा जागच्या जागीच ठेवून दिला जात असल्याने शहरात बकालीकरण वाढू लागले आहे. …सविस्तर बातमी
मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे