अमरावती : अमरावती शहरात भाजपला संपवण्यासाठी बंडखोर उमेदवार जगदीश गुप्ता यांनी दोन दशके कंबर कसली. जुन्या जाणत्या मतदारांना जगदीश गुप्ता यांच्या पक्षविरोधी कारवाया ठाऊक आहेत. म्हणूनच २००४ आणि २००९ च्या निवडणुकीत अमरावतीकरांनी त्यांना पराभूत केले. भाजपाशी व हिंदुत्वाशी कधीचे नाते तोडलेल्या जगदीश गुप्ता यांना भाजपविषयी प्रेमाचा उमाळा दाटून आला आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश प्रवक्‍ते शिवराय कुळकर्णी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवराय कुळकर्णी म्‍हणाले, परवा जगदीश गुप्ता यांचे भाजपतून निलंबन झाल्यानंतर ते आपल्या निवडक समर्थकांना घेऊन भाजप कार्यालयात आले. भाजप कार्यालयात त्यांचे दणदणीत स्वागत झाल्याची छायाचित्रे त्यांनी समाज माध्‍यमांवर प्रसारित केली, हे कृत्य पातळी सोडल्‍याचे लक्षण आहे. ज्या पक्षाने जगदीश गुप्ता यांना भरभरून दिले, त्या भाजपची परतफेड जगदीश गुप्ता यांनी कशी केली त्याची ही संतापजनक गाथा आहे. या कालावधीत जगदीश गुप्ता आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा अपमान केला. अतिशय उर्मट वर्तन केले. नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी कायम अपशब्द काढले. आजही त्यांचे समर्थक अपशब्दांचा वापर करतात, असा आरोप शिवराय कुळकर्णी यांनी केला.

हेही वाचा : “बाटना और काटना हे भाजपचे काम” मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

२००९ पासून २०२४ पर्यंत हिंदुत्व विरोधी असलेल्या काँग्रेसला खुलेआम साथ देताना जगदीश गुप्ता यांचे हिंदुत्व कुठे गेले होते? दोनदा विधानसभेची आमदारकी आणि दोनदा विधान परिषदेची आमदारकी ज्या भाजपने दिली त्या भाजपला अमरावती शहरातून संपवताना जगदीश गुप्तांचे भाजपा प्रेम कुठे गेले होते? २०१७ साली अमरावती महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व यश मिळाले. याच निवडणुकीत भाजपचे उमेदवार पाडण्यासाठी विरोधकांशी संगनमत करून गल्लीबोळात भाजपाविरोधात बैठकी घेताना जगदीश गुप्ता यांचे भाजप प्रेम कुठे गेले होते ? असा सवाल शिवराय कुळकर्णी यांनी केला.

हेही वाचा : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा….१५ नोव्हेंबरनंतर मात्र….

आता देखील काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी जगदीश गुप्ता निवडणूक रिंगणात उतरले आहे. जगदीश गुप्ता यांना मत देणे म्हणजे थेट काँग्रेसचा विजय करणे होय. म्हणूनच जगदीश गुप्ता यांना सुचलेले भाजप प्रेम हे पुतना मावशीचे प्रेम आहे. हिंदुत्वाचा व भाजपचा बुरखा पांघरून काँग्रेसच्या विजयाची ही तयारी असल्याची जाणीव आम्हाला अमरावतीकरांना करून द्यायची आहे, असे शिवराय कुळकर्णी म्‍हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati bjp leader shivray kulkarni on jagdish gupta s bjp joining and anti bjp work in past mma 73 css