नागपूर: छगन भुजबळांनी घेलेली भूमिका सर्वपक्षीय बैठकीत ठरल्याप्रमाणे आहे. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा गुंता सोडवण्यासाठी काम करावे, असे ठरले होते आणि तिच भूजबळांची भूमिका आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकु‌ळे यांनी नागपूरमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बावनकुळे म्हणाले, सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने मराठ्यांना वेगळे आरक्षण दिले जाईल असे सांगितले होते व त्याचे स्वरूप फडणवीस सरकारच्या काळातील आरक्षणाप्रमाणे असेल असे स्पष्ट केले होते. या बैठकीत ठरल्याप्रमाणे सध्या भुजबळ बोलत आहेत. मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये. ही भुजबळांची भूमिका आहे.

हेही वाचा… दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दरात मोठी घसरण, ‘हे’ आहेत आजचे दर

जरांगे पाटील बीड मधील हिंसेबद्दल जे आरोप करीत आहे तो चौकशीचा भाग असून पोलीस त्याची चौकशी करीत आहे. त्याबद्दल मी बोलणे योग्य नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

उध्दव ठाकरेंवर पुन्हा टीका

२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध केला नसता, तर मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात सर्व प्रयत्न करून मराठा आरक्षण टिकवले असते. त्यामुळे खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचा घात उद्धव ठाकरे यांनी केला, अशी टीका बावनकुळें यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In an all party meeting it was decided that the cm should work to solve the reservation issue and that is the role of chhagan bhujabal asserted bjp chandrashekhar bawankule in nagpur vmb 67 dvr