नागपूर : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून नागपूर आणि रामटेक मतदारसंघात १९ एप्रिलला मतदान होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र, या मतदारसंघात उमदेवारांचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामटेक आणि नागपूर लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होईल आणि मतमोजणी ४ जूनला केली जाणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान झाले होते. विदर्भात उन्हाळ्यात उन्हाचा तडाका असतो. त्यामुळे पहिल्या टप्प्यात निवडणूक घेण्यात येत असल्याने मतदारांना थोडासा दिलासा मिळणार आहे. १७ एप्रिलला रामनवमीची सुटी आहे आणि त्या दिवशीपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. त्यानंतर दोनच दिवसांनी शुक्रवारी मतदान होणार आहे.

हेही वाचा…लोकसभा निवडणुकीबरोबर राज्यात विधानसभेच्या एका जागेसाठी होणार पोटनिवडणूक, वाचा सविस्तर…

नागपूर आणि रामटेक मतदारसंघात काँग्रेस, भाजप आणि शिवसेना असे तीन प्रमुख पक्ष आहेत. नागपुरात तर अनेक वर्षांपासून भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होत आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपने आपला उमेदवार जाहीर केला. पण, काँग्रेसचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही.

गेल्या निवडणुकीत येथे काँग्रेसने नितीन गडकरींविरुद्ध नाना पटोले यांना मैदानात उतरवले होते. गडकरी यांनी सहा लाख ६० हजार मते घेतली होती तर पटोले यांनी ऐनवेळी निवडणूक लढवून देखील चार लाख ४४ हजार मते मिळवली होती. यावेळी देखील या दोन पक्षात थेट लढत होणार आहे. गेल्या दोन निवडणुकीत भाजपचे नितीन गडकरी यांनी विजयी पताका फडकवली आहे. ते हॅटट्रिक करतात की काँग्रेस आपला एकेकाळचा बालेकिल्ला परत मिळतो याकडे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी या मतदारसंघाचे सलग चारवेळा नेतृत्व केले आहे.

हेही वाचा…“राज्यपालांनी कुलगुरू डॉ. बोकारेंना परत बोलवावे”, गोंडवाना विद्यापीठात अनियमिततेचा सिनेट सदस्यांचा आरोप

रामटेकमध्ये महायुती आणि महाआघाडी यांच्यात उमेदवारीवरून घोळ सुरू आहे. येथे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत. आता शिवसेनेत फुट पडली आहे. एक गट महाविकास आघाडीत तर दुसऱ्या गट महायुतीमध्ये आहे. तेथे दोन्ही आघाडीने उमेदवार घोषित केलेले नाहीत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election 2024 polling in nagpur and ramtek constituencies on april 19 congress candidate picture unclear rbt 74 psg