नागपूर : शिवसेनाच्या एकनाथ शिंदे गटातील नेते रामदास कदम हे प्रसिद्धीसाठी वेगवेगळे स्टंट करत असतात. हल्ली त्यांनी उद्धव ठाकरे गटावर केलेले आरोप हे भाजपच्या सांगण्यावरून केले आहे. ते भाजप नेत्यांचा बोलता पोपट आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते व पक्षाचे राज्य संघटक सागर डबरासे यांनी केला. लोकसत्ताशी बोलतांना डबरासे यांनी आणखी काही गंभीर आरोप केले. त्याबाबत आपण जाणून घेऊ या.

शिवसेना पक्षात येण्यापूर्वी रामदास कदम राजकारणात शुन्य होते. शिवसेनाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी डोक्यावर हात ठेवल्यावर ते विविध महत्वाच्या पदांसह मंत्रीपदापर्यंत गेले. शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्षात होते. तेव्हापर्यंत त्यांना बाळासाहेबांच्या निधनानंतर दोन दिवस काय झाले हे दिसले नाही. आता ते स्वप्न बघून दोन दिवस काय झाले? असे खोटे- नाटे सांगत फिरत आहे. येत्या काळात मुंबई महारापालिकासह इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत. त्यात लाभ घेण्यासाठी भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून ते मनमानी आरोप करत फिरत आहे.

उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनी यापूर्वीच रामदार कदम यांच्या बेताल वक्तव्यावर प्रतिक्रिया देत त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार असल्यो सांगितले आहे. दरम्यान सध्या रामदार कदम यांना कुणीही विचारत नाही. त्यामुळे सामान्यांचे लक्ष आकर्षीत करून प्रसिद्धीत राहण्यासाठीही कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बेताल आरोप केल्याचाही आरोप डबरासे यांनी केला.

दरम्यान यापूर्वी अनिल परब यांनीही रामदार कदमांवर बोलतांना सांगितले होते की, मृतदेहाला दोन दिवस ठेवणे शक्य आहे का?. सोबत डॉक्टर व तज्ज्ञ तेथे उपस्थित होते. त्यामुळे रामदार कदम यांनी सांगितलेले आरोप पूर्णपने खोटे असल्याचे स्पष्ट होते.

रामदास कदम यांनीकाय आरोप केले ?

बाळासाहेब ठाकरे यांचे मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवले. मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंच्या हातांचे ठसे घेतले गेले. ते कशासाठी हे स्पष्ट व्हायला हवे, असा आरोप रामदास कदम यांनी केला. दरम्यान कदम यांनी इतरही गंभीर आरोप केले. त्यावर अनिल परब यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सांगतिले की, कदम यांचे आरोप खोटे आहे. १५ वर्षांनी कदम यांना कंठ फुटला आहे. २०१४ मध्ये कदम मंत्री झाले. उद्धव ठाकरे एवढे वाईट होते तर त्यांनी मंत्रीपद का स्विकारले? असा सवालही परब यांनी उपस्थित केला.