उरण : मार्ग सुरू करण्यासाठी रेल्वे विभागाच्या सर्व चाचण्या होऊनही वर्षभर रखडलेला उरण – खारकोपर रेल्वे मार्ग सुरू करा या मागणीसाठी गुरुवारी सकाळी काँग्रेसने गाजर दाखवा आंदोलन केले. यावेळी रेल्वे आणि सरकारच्या धरसोड वृत्तीचा निषेध केला. हा रेल्वेमार्ग सुरू न झाल्याने नागरिक विद्यार्थी आणि व्यवसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे उरणच्या नागरिकांमध्ये ही असंतोष निर्माण झाला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा : उरणच्या बाजारात वालाच्या शेंगा; खवय्यांना थंडीत पोपटीची चाहूल
ही सेवा सुरू करण्यासाठी वारंवार तारखा जाहीर झाल्याचे वृत्त आले. मात्र वर्षभरात सेवा सुरू न झाल्याने काँग्रेसने गाजर दाखवा आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, बबन कांबळे, माजी नगरसेविका अफशा मुखरी, रेखा घरत यांनी केले.
First published on: 07-12-2023 at 14:00 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In uran congress protest to start uran kharkopar railway line css