-
दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप ब्रह्मदेव माने यांनी पाच वर्षांनंतर ठाकरे गट सोडून पून्हा एकदा काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.
-
मुंबईतील प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवनात काल (३१ मार्च) रोजी, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.
-
दिवंगत नेते, माजी आमदार ब्रह्मदेव माने यांचे पुत्र असलेले दिलीप माने हे २००९ साली दक्षिण सोलापूरमधून विधानसभेवर निवडून गेले होते.
-
२००४ सालच्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघात अपक्ष म्हणून लढत दिली होती.
-
२०१४ साली ते काँग्रेसच्या चिन्हावर दक्षिण सोलापूर विधानसभा जागेवर उभे राहिले असता भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
-
२०१९ साली बदलते राजकीय वारे पाहून ते शिवसेनेत गेले आणि सोलापूर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना आव्हान दिले होते. (Photo-ANI)
-
सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीसह ब्रह्मदेवदादा सहकारी बँक, दोन खासगी साखर कारखाने, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय आदी संस्थांच्या माध्यमातून त्यांची ताकद आहे.
-
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर दिलीप माने हे आपल्या सहका-यांसह स्वगृही परतल्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांची ताकद वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
-
(फोटो- Express Photos By Ganesh Shirsekar)
दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने, ठाकरेंच्या शिवसेनेमधून पुन्हा काँग्रेसमध्ये!
दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी काल (३१ मार्च) रोजी ठाकरे गट सोडून पून्हा एकदा काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.
Web Title: Former mla solapur constituency dilip mane joined congress again spl