• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. lok sabha election female candidate celebrate gudi padwa 2024 see pictures kvg

Photo : नवनीत राणा ते सुप्रिया सुळे, लोकसभेच्या महिला उमेदवारांनी उभारली गुढी

Gudi Padwa 2024 : लोकसभा निवडणुकांचा हंगाम सुरू असताना उमेदवार एका बाजूला प्रचारात गुंतले आहेत. अनेक महिला नेत्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यातच आज गुढीपाडवा सण असताना महिला उमेदवारांनी सण आणि प्रचाराची सांगड घातली. (सर्व फोटो फेसबुकवरून)

April 9, 2024 20:50 IST
Follow Us
  • Navneet Rana _ 3
    1/11

    अमरावती लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी गुढीपाडवा सण उत्साहात साजरा केला.

  • 2/11

    अमरावती येथे राणा दाम्पत्यांनी उभ्या केलेल्या गुढीला विजयाची गुढी असे नाव दिले. भाजपातून निवडणूक लढवत असल्यामुळे नवनीत राणा चांगल्याच उत्साहात आहेत.

  • 3/11

    नवनीत राणा यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपले पती आमदार रवी राणा यांच्यासह जोरदार प्रचार सुरू केला आहे.

  • 4/11

    बीड लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनीही आज गुढी उभारून प्रचार केला.

  • 5/11

    गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम करणाऱ्या शिरूर कासार तालुक्यातील धनगरवाडी गावात पंकजा मुंडे यांनी गुढीपाडवा सण साजरा केला.

  • 6/11

    बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनीही कुटुंबियासह गुढीपाडवा सण साजरा केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सासू, मुलगा पार्थ आणि यश उपस्थित होते.

  • 7/11

    यावेळी पार्थ पवार आणि अजित पवार यांनी स्वतः गुढी उभी करून कौटुंबिक वातावरणात सण साजरा केला.

  • 8/11

    सुनेत्रा पवार यांच्या विरोधक सुप्रिया सुळे यांनीही बारामतीमधील गोविंदबागेत गुढी उभारली. नणंद-भावजय एकमेकींच्या विरोधात लढत आहेत. त्यामुळे बारामतीच्या निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

  • 9/11

    सुप्रिया सुळे यांच्यासह पती सदानंद सुळे, मुलगी रेवती सुळेही उपस्थित होत्या.

  • 10/11

    यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून शिवसेनेने विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट करून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना तिकीट दिले आहे.

  • 11/11

    राजश्री पाटील यांनी यवतमाळमधील आपल्या माहेरी गुढी उभी केली. तसेच प्रचाराची सुरुवात केली.

TOPICS
गुढी पाडवा सेलिब्रेशनGudi Padwa Celebrationगुढीपाडवा २०२५Gudi Padwa 2025नवनीत राणाNavneet Ranaपंकजा मुंडेPankaja Mundeलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionसुनेत्रा पवारSunetra Pawarसुप्रिया सुळेSupriya Sule

Web Title: Lok sabha election female candidate celebrate gudi padwa 2024 see pictures kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.