• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. jayant patil and sanjay raut reply amit shah on maharashtra partys are duplicate statement spl

Loksabha Election 2024: कोण असली, कोण नकली हे जनता ठरवेल; अमित शहांना दिलेल्या प्रत्युत्तरात जयंत पाटील, संजय राऊत काय म्हणाले?

नांदेड येथे काल (११ एप्रिल) लोकसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या प्रचारसभेत राज्यात एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि अर्धी उरलेली काँग्रेस आहे, असे अमित शाह म्हणाले होते.

Updated: April 12, 2024 14:13 IST
Follow Us
  • sanjay raut and jayant patil on amit shah
    1/10

    भाजपाचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेड येथे काल (११ एप्रिल) लोकसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या प्रचारसभेत महाविकास आघाडीवर टीका केली होती. (Photo Source- Amit Shah/Facebook Page)

  • 2/10

    राज्यात एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि अर्धी उरलेली काँग्रेस आहे, असे अमित शाह म्हणाले होते. (Photo Source- Amit Shah/Facebook Page)

  • 3/10

    यावर आता, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शाह यांना प्रत्युत्तर दिले आहे. (Photo Source- Jayant Patil/Facebook Page)

  • 4/10

    याशिवाय शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनीही अमित शाहंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

  • 5/10

    जयंत पाटील म्हणाले “एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि मग आपण त्यातल्या एकाला नकली म्हणायचं. ज्यांनी फोडा-फोड केली त्यांनीच त्यात कोण असली आणि कोण नकली ठरवणं योग्य नाही.” (Photo Source- Jayant Patil/Facebook Page)

  • 6/10

    जयंत पाटील पुढे म्हणाले “खरंतर कोण असली, कोण नकली, हे महाराष्ट्रातील जनतेला हे ठरवू दिलं पाहीजे. जनतेने हा निकाल घेतला आहे, तो मतपेटीतून दिसेल” (Photo Source- Jayant Patil/Facebook Page)

  • 7/10

    संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की “अमित शाह यांच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला नकली म्हणाले होते. पण मी सांगू इच्छितो की असली कोण आणि नकली कोण हे अमित शाह ठरवू शकत नाही. तुमच्या हातात पैसा आणि सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांना हाताशी धरुन पक्ष खरा की खोटा ठरवणार असाल तर जनता ते सहन करणार नाही.” (Photo Source- Sanjay raut/Facebook Page)

  • 8/10

    संजय राऊत पुढे म्हणाले “याच नकली शिवसेनेचे प्रमुख तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे त्यांच्यासमोर नाक रगडायला तुम्ही मातोश्रीवर अनेकदा आला आहात. २०१९ ला मातोश्रीवर आलात तेव्हा हीच शिवसेना असली होती. आता खोटे गोटे गळ्यात अडकवून फिरत आहात, त्यांना असली म्हणत आहात. मात्र आता हे गोटेच तुमचा कपाळमोक्ष करतील.” (Photo Source- Sanjay raut/Facebook Page)

  • 9/10

    “महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातली शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हेच दोन खरे पक्ष आहेत. बाकी अमित शाह यांनी जे डुप्लिकेट पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दिले आहेत, त्याचा निकाल या निवडणुकीत जनता लावल्याशिवाय राहणार नाही.” असं राऊत म्हणालेत.

  • 10/10

    हेही पहा- Loksabha Election 2024: शरद पवारांसह काँग्रेस, उद्धव ठाकरेंवर टीका! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नांदेडच्या भाषणात काय म्हणाले?

TOPICS
जयंत पाटीलJayant Patilभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPoliticsराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPशरद पवारSharad PawarशिवसेनाShiv Senaसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Jayant patil and sanjay raut reply amit shah on maharashtra partys are duplicate statement spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.