Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. ajit pawar on sharad pawar latest statement from amaravati rally maharashtra politics news spl

Lok Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवारांची शरद पवारांवर टीका; म्हणाले, “अनेकांना माहिती नसेल…”

उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावतीमध्ये भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

April 22, 2024 10:29 IST
Follow Us
  • ajit pawar on sharad pawar
    1/11

    अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. हे दोन्ही गट सातत्याने एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आहेत.

  • 2/11

    लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सहकारी शरद पवारांबाबत वेगवेगळे गौप्यस्फोट करत आहेत, शरद पवारांवर वेगवेगळे आरोप करत आहेत. तर शरद पवार देखील अजित पवारांना टोले लगावत आहेत.

  • 3/11

    “शरद पवार हे सातत्याने भाजपाच्या बाजूने भूमिका घेत होते,” असा आरोप अजित पवार, प्रफुल्ल पटेल, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी केला आहे. तसेच “शरद पवार २०१४ च्या आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यावर भाजपाच्या बाजूने जाण्याबाबत बोलत होते,” असाही आरोप अजित पवार गटातील नेत्यांनी यापूर्वी केला आहे.

  • 4/11

    दरम्यान, आता अजित पवार यांनी थेट शरद पवार यांचं नाव न घेता नवा गौप्यस्फोट केला आहे.

  • 5/11

    अजित पवार अमरावती येथे भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत केलेल्या भाषणावेळी म्हणाले, “माझ्यासमोर युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना जाती-पाती आणि नात्यागोत्याचा विचार केला नव्हता. त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. राजांनी सर्व मावळ्यांना एकवटलं आणि त्यातून इतिहास निर्माण केला. हा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. महाराजांचा हा इतिहास ऐकल्यावर आजही आपली छाती फुगते. असाच काही इतिहास लोकांना माहिती नाहीये.”

  • 6/11

    अजित पवार पुढे म्हणाले, “मी विकासाच्या मागे जाणारा कार्यकर्ता असल्यामुळे काही निर्णय घेतले. मी अनेकदा आमच्या सहकाऱ्यांना सांगितलं, काही वेळा आमच्या वडिलधाऱ्यांनाही (शरद पवारांना) सांगितलं होतं.”

  • 7/11

    “अनेकांना माहिती नसेल की, २०१४ मध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण निकाल यायच्या आधीच भारतीय जनता पार्टीला विधानसभेत बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यानंतर आपले देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले होते.”

  • 8/11

    “त्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की काही दिवसांनी आपल्याला त्या सरकारमध्ये जायचं आहे. परंतु, कुठं काय खटकलं माहिती नाही. तेव्हा वरून केवळ आदेश यायचे आणि आम्ही फक्त त्या आदेशांची अंमलबजावणी करायचो.” असं ते म्हणाले.

  • 9/11

    उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून मी महाराष्ट्रभर फिरतो. मला पहाटे पाच वाजता उठून सहा वाजता कामाला लागायची सवय आहे. मी अक्षरश: माझ्या मतदारसंघात ६ वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो. तेच सातत्य मी आजपर्यंत टिकवलं आहे. त्यामुळे मी कामाचा माणूस आहे.”

  • 10/11

    ते पुढे म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील दिवसाच्या २४ तासांतले १८ ते २० तास काम करतात. परदेशातून आले तरी आराम न करता कामाला लागतात.”

  • 11/11

    (सर्व फोटो साभार- शरद पवार, अजित पवार/फेसबुक पेज)

TOPICS
अजित पवारAjit PawarअमरावतीAmravatiभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsमहायुतीMahayutiमहाविकास आघाडीMahavikas Aghadiराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPशरद पवारSharad PawarशिवसेनाShiv Sena

Web Title: Ajit pawar on sharad pawar latest statement from amaravati rally maharashtra politics news spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.