-
लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी असा सरळ सामना होणार आहे.
-
मात्र महायुतीमध्ये अनेक जागांवरील तिढा सुटलेला नाही. यामध्ये नाशिक जागेचाही समावेश आहे. या जागेवर शिवसेना (शिंदे गट) यांच्या पक्षाचे नेते हेमंत गोडसे हे उत्सुक आहेत.
-
तर दुसरीकडे याच जागेसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्या नावाचीही चर्चा होत आहे.
-
असे असतानाच आता भाजपाच्या बीड मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आले आहे.
-
पंकजा मुंडेंच्या वक्तव्यामुळे नाशिकच्या जागेवर भाजपाच्या नेत्या प्रीतम मुंडे यांना उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न विचारला जातोय.
-
दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी बुधवारी (२४ एप्रिल) प्रचाराचा शेवटचा दिवस होता. या प्रचाराच्या सभेत बोलताना भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी खासदार प्रीतम मुंडे यांच्याबाबत मोठं विधान केलं.
-
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
“प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही, मी हा शब्द दिला होता. मला तिकीट देऊ नका, असं म्हणूनच मी सगळीकडे गेले होते. मात्र, मला हे आता लक्षात आलं की, ही निवडणूक कशाची आहे. ताईचं (प्रीतम मुंडे) कुठेही अडणार नाही. त्यांना मी नाशिकमधून उभे करेल, तुम्ही काळजी करू नका. ताईचं राजकारण हे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पश्चात होतं. पण मी मुंडे साहेब असताना त्यांचा हात बनले होते”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. -
महायुतीचा नाशिकचा तिढा सुटेना
महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट या पक्षात रस्सीखेच सुरू असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेचा तिढा सुटत नसल्याचे चित्र आहे. -
(सर्व फोटो पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, हेमंत गोडसे, छगन भुजबळ यांच्या फेसबुक खात्यांवरून साभार.)
Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
महायुतीमध्ये अनेक जागांवरील तिढा सुटलेला नाही. यामध्ये नाशिक जागेचाही समावेश आहे.
Web Title: Nashik constituency pankaja munde statement on sister pritam munde latest news of loksabha election spl