• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. shrikant shinde and naresh mhaske meet mns leader raj thackeray at mumbai home

श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली राज ठाकरेंची भेट; ठाणे, कल्याणमध्ये प्रचारसभा ठरल्या?

ठाणे आणि कल्याण या दोन्ही मतदारसंघांतील शिंदे गटाच्या उमेदवारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली.

Updated: May 2, 2024 15:42 IST
Follow Us
  • raj thackeray news
    1/10

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरलेली ठाणे लोकसभेची जागा अखेर शिंदे गटाला मिळाल्याचे काल स्पष्ट झाले.

  • 2/10

    ठाण्यातून नरेश म्हस्के तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

  • 3/10

    त्यानंतर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के या शिंदे गटाच्या दोन्ही उमेदवांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

  • 4/10

    मुंबईसह ठाणे आणि कल्याण पट्ट्यात राज ठाकरे यांना मानणारा एक वर्ग आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात राजू पाटील यांच्या रूपाने मनसेचा एकमेव आमदार असून ते यापूर्वीच श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत.

  • 5/10

    साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अविनाश जाधव यांना ७४ हजार मते मिळाली होती. भाजपा उमेदवार संजय केळकर यांच्यावर नाराज असलेल्या शिवसैनिकांनी अविनाश जाधव यांना मतांची रसद पुरविल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती.

  • 6/10

    राज्यभर सुरू असलेल्या महायुतीच्या सभामध्ये अजूनतरी राज ठाकरे यांनी सहभाग घेतला नाही. ठाणे कल्याणात मात्र राज सभा घेतील असा दावा श्रीकांत शिंदे यांनी केला.

  • 7/10

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राज ठाकरे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी शनिवारी कोकणात सभा घ्यावी, असे प्रयत्न सुरू आहेत. राज ठाकरे यांनी अजून सभेसाठी मान्यता दिलेली नाही, असे मनसेच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

  • 8/10

    राणे आणि शिंदे यांच्यासाठी सभा घेतल्यास शिवसेनेतील जुन्या सहकाऱ्यांसाठी राज ठाकरे हे सभा घेतील. शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्यास धनुष्यबाणाला मतदान करा, असे आवाहन राज ठाकरे यांना करावे लागेल.

  • 9/10

    (सर्व फोटो एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, नारायण राणे, अविनाश जाधव यांच्या फेसबुक खात्यांवरुन साभार)

  • 10/10

    हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : हैदराबादमध्ये यंदा माधवी लता असदुद्दीन ओवेसींचा गड भेदणार का?

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeकल्याणKalyanठाणेThaneडॉ. श्रीकांत शिंदेभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsराज ठाकरेRaj ThackerayशिवसेनाShiv Sena

Web Title: Shrikant shinde and naresh mhaske meet mns leader raj thackeray at mumbai home

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.