Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. mns leader raj thackeray and pm narendra modi rally in mumbai at shivaji park election sabha spl

मुंबईतील शिवाजी पार्कात पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंची तोफ धडाडणार?

राज ठाकरे भाजपाच्या सभेत सामील होतील, असं मनसे नेते बाळा नांदगावकर  म्हणाले.

Updated: May 10, 2024 11:12 IST
Follow Us
  • raj thackeray
    1/10

    रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील महायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी ४ मे रोजी राज ठाकरे यांनी सभा घेतली.

  • 2/10

    या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपाच्या मंचकावरून प्रथमच भाषण करताना दिसले.

  • 3/10

    यानंतर आता ते शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर महायुतीच्या प्रचारासाठी संयुक्त सभा घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • 4/10

    भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसैनिक महायुतीच्या प्रचाराला लागले, पंतप्रधान नरेंद्र मोदीही महायुतीच्या उमेदवारांसाठी गेले काही दिवस महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत.

  • 5/10

    त्यातचं आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेही महायुतीचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

  • 6/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ मे रोजी मुंबईत रोड शो होणार असून त्यानंतर प्रचारसभा होणार आहे. ही सभा शिवाजी पार्क येथे होईल.

  • 7/10

    महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यामध्ये आता पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच राजकिय मंचावर पहायला मिळणार आहेत. भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार शिवाजी पार्कमध्ये १७ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. या सभेला राज ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.

  • 8/10

    मुंबईतील शिवाजी पार्क येथे मुंबईतील सर्व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. राज ठाकरे भाजपाच्या सभेत सामील होतील, असं मनसे नेते बाळा नांदगावकर  म्हणाले.

  • 9/10

    या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे काय बोलणार? विशेषतः उद्धव ठाकरेंना कशा पद्दतीने लक्ष करणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

  • 10/10

    दरम्यान, महायुतीच्या पुण्यातील उमेदवारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज १० मे रोजी पुण्यात सभा होणार आहे. भाजपाचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारानिमित्त ही सभा होणार आहे. महायुतीच्या उमेदवारासाठीची ठाकरे यांची ही दुसरी सभा आहे.

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeनरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsमुंबईMumbaiराज ठाकरेRaj ThackerayशिवसेनाShiv Sena

Web Title: Mns leader raj thackeray and pm narendra modi rally in mumbai at shivaji park election sabha spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.