• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. ncp mla rohit pawar on pm narendra modi in latest tweet about the onion subject spl

रोहित पवारांचं नरेंद्र मोदींसह विरोधकांवर टीकास्र! म्हणाले, “पंतप्रधानांचा टेलीप्रॉम्प्टर…”

मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील कांदा उत्पादकांना नोटीस देण्यावरून रोहित पवारांचं टीकास्र!

Updated: May 16, 2024 13:57 IST
Follow Us
  • rohit pawar on modi
    1/11

    महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काल ( बुधवारी) नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

  • 2/11

    या सभेपूर्वी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे तसेच कांदा उत्पादक शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसाही बजावण्यात आल्याचे समोर आले होते.

  • 3/11

    यावरून शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

  • 4/11

     रोहित पवार यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

  • 5/11

    काय म्हणाले रोहित पवार?
    “पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये येणार आहेत म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नोटीस दिली जात आहे. काहींना तर अटकही करण्यात आली आहे.”

  • 6/11

     “खरं तर निर्विवाद सत्ता उपभोगणाऱ्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेतले असते, तर कदाचित ही वेळ आली नसती”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. 

  • 7/11

    तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी कांद्याची माळ घालून पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करावे, असं आव्हानही दिले.

  • 8/11

    पुढे बोलताना, “राज्यातील नेते फुसका बार आहेत, तर पंतप्रधान मोदी यांची कांद्याच्या प्रश्नापासून दूर पळण्याची इच्छा आहे.”

  • 9/11

    “मात्र, महाराष्ट्रातील उध्वस्त झालेला शेतकरी बघून पंतप्रधान मोदी यांचा टेलीप्रॉम्प्टर तरी कांद्याबद्दल एखादा शब्द बोलेल ही अपेक्षा आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान पंतप्रधान मोदींची सभा पार पडली आणि कांदा प्रश्नावरुन या सभेत थोडा गोंधळ उडाल्याचेही पहायला मिळाले.

  • 10/11

    (सर्व फोटो रोहित पवार या फेसबुक पेजवरुन साभार.)

  • 11/11

    हेही पहा- “शरद पवार अजित पवारांची ‘ती’ इच्छा पूर्ण करणार होते” ; जयंत पाटलांचं विधान

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्रMaharashtraरोहित पवारRohit Pawarलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Ncp mla rohit pawar on pm narendra modi in latest tweet about the onion subject spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.