-
अभिनेते सचिन पिळगावकर आणि त्यांच्या पत्नी सुप्रिया पिळगावकर यांची जोडी म्हणजे मनोरंजन सृष्टीतील प्रचंड लोकप्रिय जोडी आहे.
-
सोशल मीडियावरून ते त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट्स त्यांच्या चाहत्यांना देत असतात.
-
सुप्रिया पिळगावकर यांच्या माहेरकडच्यांनी नुकतंच सचिन पिळगावकर यांना अधिक महिन्याचं वाण दिलं. यानिमित्त सुप्रिया पिळगावकर यांनी त्यांच्या माहेरच्या घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
-
त्यांच्या घराबाहेर शंकराचा रूप असलेल्या श्री मंगेशाचा फोटो आहे.
-
तर त्यांच्या घरातील सर्व खोल्या प्रशस्त आहेत. सगळ्या खोल्यांमध्ये भरपूर उजेड आहे.
-
याचबरोबर हे घर विविध मूर्ती, फोटो फ्रेम आणि आकर्षक वस्तूंनी सजवण्यात आलं आहे.
-
तसंच या घराला रंग देताना अगदी सोबर रंगसंगती वापरण्यात आली आहे. या रंगांमुळे हे घर आणखी आकर्षक दिसतं.
-
त्यांच्या घराच्या भिंतींनाही डिझाईन करण्यात आलं आहे.
-
या घराचा प्रत्येक कोपरा अगदी विचारपूर्वक सजवलेला आहे
प्रशस्त खोल्या, आकर्षक वस्तू अन्…; सचिन पिळगांवकर यांची सासुरवाडी पाहिलीत का? घराची झलक समोर
सुप्रिया पिळगांवकर यांच्या माहेरकडच्यांनी नुकतंच सचिन पिळगावकर यांना अधिक महिन्याचं वाण दिलं. यानिमित्त सुप्रिया पिळगावकर यांनी त्यांच्या माहेरच्या घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
Web Title: Actress supriya pilgaonkar shared glimpse of her maternal house photos gets viral rnv