-
बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत दीपिका पदुकोणपासून कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा या नावांचा समावेश आहे. (Photo: deepikapadukone/instagram)
-
या अभिनेत्री वर्षानुवर्षे बॉलिवूडवर राज्य करत आहेत. (Photo: katrinakaif /Instagram)
-
या सर्व अभिनेत्री एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेतात.
-
त्यांची एकूण संपत्ती देखील करोडोंमध्ये आहे. (Photo: PriyankaChopra/instagram)
-
दरम्यान, या अभिनेत्री केवळ अभिनयाचेच काम करत नाहीत. (Photo: Kriti Sanon/Instagram)
-
तर बिझनेस वुमन्स देखील आहेत. (Photo: deepikapadukone/instagram)
-
या सर्व अभिनेत्री त्यांच्या बिझनेसमधूनही करोडोंची कमाई करतात. या अभिनेत्री वर्षानुवर्षे बॉलिवूडवर राज्य करत आहेत. (Photo: katrinakaif /Instagram)
-
चला तर मग जाणून घेऊया या अभिनेत्रींच्या व्यवसायाबद्दल. (Photo: Alia Bhatt/Instagram)
-
कतरिना कैफ
कतरिना कैफ ही बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती के-ब्युटी ब्रँडची मालकीण आहे. के-ब्युटी हा ब्रँड मेकअपच्या जगात खूप लोकप्रिय आहे आणि त्यातून तिला करोडोंची कमाई होते. (Photo: katrinakaif /Instagram) -
दीपिका पदुकोण
या यादीत दुसरे नाव दीपिका पदुकोणचे आहे. ती 82*E या ब्युटी ब्रँडची मालकही आहे. या ब्रँडमध्ये स्किनकेअरचे अनेक प्रॉडक्ट आहेत. रिपोर्ट्सनुसार, दीपिका या ब्रँडद्वारे वर्षाला ११ कोटी रुपयांहून अधिक कमाई करते. (Photo: deepikapadukone/instagram) -
प्रियांका चोप्रा
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा देखील एक बिझनेसवुमन आहे. ती अनोमली हेअर केअर ब्रँडची मालक आहे. हा एक आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे, जो केवळ भारतातच नाही तर परदेशातही लोकप्रिय आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या व्यवसायातून वार्षिक ४,८४३ कोटी रुपये कमावले आहेत. (Photo: PriyankaChopra/instagram) -
क्रिती सॅनन
क्रिती सॅननने देखील अलीकडेच व्यवसायाच्या जगात प्रवेश केला आहे आणि ती हायफन नावाचा ब्रँड देखील चालवते. हा एक स्किनकेअर ब्रँड आहे. अभिनेत्रीचा हा ब्रँड सर्वसामान्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती यातून वर्षाला १०० कोटी रुपये कमावते. (Photo: Kriti Sanon/Instagram) -
आलिया भट्ट
आलिया भट्ट लहान मुलांच्या कपड्यांचा आणि पुस्तकांचा व्यवसाय चालवते. ED-A-Mamma हे अभिनेत्रीच्या ब्रँडचे नाव आहे. यातून ती वर्षाला करोडोंची कमाई करते. (Photo: Alia Bhatt/Instagram) -
(Photo: PriyankaChopra/instagram) हेही वाचा: ‘या’ देशातील विवाहित पुरुष सर्वाधिक फसवणूक करतात तर येथील ५६% पुरुष बायकोला फसवतात, भारतातील स्थिती काय आहे?
Photos : बॉलीवूडच्या ‘या’ टॉप अभिनेत्री केवळ अभिनयच करत नाहीत तर व्यवसायीक देखील आहेत, करतात करोडोंची कमाई
एका चित्रपटासाठी करोडो रुपये मानधन घेणाऱ्या अभिनेत्री व्यावसायातूनही मोठी कमाई करतात.
Web Title: Deepika padukone katrina kaif to kriti sanon 5 bollywood actresses who are successful entrepreneurs spl