-
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांनी बुधवारी (११ सप्टेंबर) आत्महत्या केली आहे. त्यांचा मृत्यू छतावरून पडून झाला की त्यांनी आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत. ६२ वर्षीय अनिल मेहता यांच्यावर गुरुवारी मुंबईतील सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (Photo: Jansatta)
-
मलायका अरोराच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. (Photo: Jansatta)
-
यादरम्यान मलायका अरोरा तिची आई जॉयस पॉलीकार्प आणि मुलगा अरहान खानसोबत दिसली. (Photo: Jansatta)
-
या दुःखाच्या वेळी अर्जुन कपूरही मलायका अरोरासोबत उभा होता. (Photo: Jansatta)
-
अनिल अरोराच्या अंत्यसंस्कारासाठी मलायका अरोराचा माजी पती अरबाज खानही सांताक्रूझला पोहोचला. (Photo: Jansatta)
-
या दुःखाच्या वेळी मलायका अरोरासोबत सैफ अली खानही दिसला. (Photo: Jansatta)
-
सैफ अली खान व्यतिरिक्त त्याची पत्नी करीना कपूर खान देखील मलायकाच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाली होती. करीना आणि मलायका दोघीही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. (Photo: Jansatta)
-
प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक, कोरिओग्राफर आणि फिल्ममेकर फराह खान देखील अंत्यसंस्काराला उपस्थित होती. फराह खान आणि मलायका अरोराची मैत्री खूप जुनी आहे. (Photo: Jansatta)
-
यावेळी अभिनेता अर्शद वारसीही दिसला. (Photo: Jansatta)
-
अनिल मेहता यांच्या अंत्यसंस्काराला सोहल खानही उपस्थित होता. (Photo: Jansatta)
-
अनिल मेहता यांच्या अंत्यसंस्काराला दिग्दर्शक साजिद खानही उपस्थित होते. (Photo: Jansatta)
दु:खद प्रसंगी मलायका अरोराबरोबर अर्जुन कपूर उभा दिसला, वडील अनिल मेहतांच्या अंत्यविधीसाठी ‘हे’ स्टार्स राहिले उपस्थित
Malaika Aroras father Anil Mehta s funeral: मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांच्या अंत्यसंस्काराला चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. या दुःखाच्या वेळी अर्जुन कपूरपासून तिचा माजी पती अरबाज खानपर्यंत सर्वजण मलायका अरोरासोबत उभे असल्याचे दिसले.
Web Title: Malaika arora s father anil mehta s arjun kapoor ex husband arbaaz khan and these celebrities pay last respects spl