-
दक्षिण चित्रपटसृष्टीतील ताकदवान अभिनेत्री समांथा रूथ प्रभू केवळ तिच्या चित्रपटांमुळेच नाही तर तिच्या लूक आणि वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. अभिनेत्रीला तिचा माजी पती नागा चैतन्यपासून वेगळे होऊन तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण आजही त्यांच्या नात्याची चर्चा कोणत्या ना कोणत्या कारणाने होते. (Photo- Samantha/Instagram)
-
दरम्यान, आता ही अभिनेत्री तिच्या एका विधानामुळे चर्चेत आहे. तिने हृतिक रोशनच्या लूकबद्दल असे काही म्हटले की तिच्या वक्तव्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. (Photo- Samantha/Instagram)
-
हृतिक रोशनला त्याच्या लूकमुळे अनेकदा ‘ग्रीक गॉड’ म्हटले जाते. त्याच वेळी, समांथा रूथ प्रभूने त्याच्याबद्दल सांगितले की तिला त्याचा लूक अजिबात आवडत नाही. दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या माजी पतीबद्दल तो देखणा असल्याचे सांगितले आहे. या विधानामुळे ही अभिनेत्री चर्चेत आली आहे. (Photo- Samantha/Instagram)
-
खरंतर, समांथा रूथ प्रभू एकदा साक्षी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलली होती, त्यातील व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर पुन्हा शेअर करण्यात आली आहे आणि व्हायरल होत आहे. त्यावेळी, तिला काही कलाकारांना मार्क्स देऊन त्यांचे लूक कसे आहेत हे सांगायचे होते. दरम्यान, महेश बाबूचे नाव पहिले आले आणि त्याला समंथाने १० पैकी १० गुण दिले आणि त्याबद्दल विचारच करण्याची गरज नाही असेही तिने सांगितले. (Photo- Samantha/Instagram)
-
यासोबतच, जेव्हा हृतिक रोशनचे नाव घेतले गेले तेव्हा ती विचारात पडली आणि उत्तर दिले की कोणीही यावरून माझ्यावर टीका करू शकते पण मला हृतिकचा लूक फारसा आवडत नाही. समंथाने त्याला १० पैकी ७ रेटिंग दिले होते. या यादीत, तिने माजी पती नागा चैतन्यला १० पैकी १० रेटिंग दिले आणि रणबीर कपूरला १० पैकी ८ रेटिंग दिले होते. (Photo- Samantha/Instagram)
-
त्याच मुलाखतीत, समांथाला शाहिद कपूरबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की ‘कमिने’ चित्रपटाच्या आधी तिने शाहिदला १० पैकी ५ रेटिंग दिले असते आणि ‘कमिने’ नंतर मात्र शाहिदला १० पैकी ९ रेटिंग दिले होते. (Photo- Samantha/Instagram)
-
समांथा तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चेत आहे. नागा चैतन्यपासून वेगळी झाल्यानंतर, अभिनेत्रीचे नाव अनेक स्टार्सशी जोडले गेले आहे. सध्या ती दिग्दर्शक राज निदिमोरूला डेट करत असल्याची चर्चा आहे. अलीकडेच ते दोघे तिरुपती बालाजी मंदिरात एकत्र दिसले, त्यानंतर पुन्हा एकदा सामंथाच्या अफेअरच्या चर्चा तीव्र झाल्या आहेत. (Photo- Samantha/Instagram)
-
‘सिटाडेल हनी बनी’ दरम्यान समांथा रूथ प्रभू आणि राज निदिमोरू जवळ आल्याचे म्हटले जाते. सिरीजचे दिग्दर्शन स्वतः राज यांनी केले आहे. दोघेही आयपीएलमध्येही एकत्र चिअर करताना दिसले आहेत. (Photo- Samantha/Instagram)
-
समांथा आता ‘शुभम’ या आगामी सिनेमामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ९ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. यापूर्वी ही अभिनेत्री वरुण धवनसोबत सिटाडेलमध्ये दिसली होती. तर दक्षिणेत ती विजय देवरकोंडा याच्यासोबत ‘खुशी’ मध्ये दिसली होती. (Photo- Samantha/Instagram) हेही पाहा- Photos : वेस्टर्न लूकमध्ये हॉट नेहा खान, फोटो पाहिलेत का?
समांथा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यला म्हणतेय देखणा, हृतिक रोशनचे लूक पसंत नाहीत; सध्या कोणाला करतेय डेट?
लग्नाच्या ४ वर्षातच समांथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचे नाते तुटले. या जोडप्याने २०१७ मध्ये लग्न केले आणि २०२१ मध्ये ते वेगळे झाले. नागा चैतन्यने आता शोभिता धुलिपालाशी दुसरे लग्न केले आहे. अशा परिस्थितीत, समंथाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती तिच्या माजी पतीला देखणा म्हणत आहे आणि हृतिकबद्दल असे काही बोलली आहे…
Web Title: Samantha ruth prabhu calls ex husband naga chaitanya handsome did not like hrithik roshan look gave 7 number out of 10 south adda spl