Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. what happens to the body when you give up salt for a month snk

महिनाभर मीठ खाल्ले नाही तर आरोग्यावर काय होईल परिणाम? तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या…

एखाद्याने त्यांच्या आहारातून मीठ पूर्णपणे काढून टाकावे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. म्हणूनच एका महिन्यासाठी मीठाचे सेवन बंद केल्यास आरोग्यावर काय परिणाम होतात? याबाबत इंडियन एक्सप्रेस एक तज्ज्ञांशी चर्चा केली.

Updated: January 10, 2024 00:20 IST
Follow Us
  • What Happens To The Body When You Give Up Salt For A Month
    1/10

    मीठ हे आपल्या आहारातील एक आवश्यक घटक आहे – ते अन्नाची चव वाढवते, जास्त दिवस अन्न टिकवण्यास मदत करते. पण मीठाचे सेवन करण्याचे काही फायदे आणि काही तोटे देखील आहेत. जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केल्याने अनेक आजार होऊ शकतात विशेषतः उच्च रक्तदाब जो हार्ट अ‍ॅटक आणि स्ट्रोक होण्यास कारणीभूत ठरणारा मुख्य घटक आहे. 

  • 2/10

    गरजेपेक्षा जास्त मीठ खाल्यामुळे किडनीवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे किडनी खराब होऊ शकते किंवा मुतखडा होऊ शकतो. याशिवाय, जास्त मीठयुक्त आहार पोटाचा कर्करोग आणि ऑस्टिओपोरोसिस होण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे एखाद्याने त्यांच्या आहारातून मीठ पूर्णपणे काढून टाकावे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. म्हणूनच एका महिन्यासाठी मीठाचे सेवन बंद केल्यास आरोग्यावर काय परिणाम होतात? याबाबत इंडियन एक्सप्रेस एक तज्ज्ञांशी चर्चा केली.

  • 3/10

    याबाबत कोलकत्ता येथील मुकुंदापूरच्या आरएन टागोर हॉस्पिटलमध्ये पोषण आणि आहारतज्ज्ञ स्वेता बोस यांनी ठामपणे सांगितले की,”मानवी शरीर सोडियमशिवाय जगू शकत नाही. जेव्हा तुम्ही एका महिन्यासाठी मीठाचे सेवन पूर्णपणे बंद करता तेव्हा शरीरामध्ये मोठे बदल होतात. सुरुवातीला सोडियमचे सेवन कमी झाल्यामुळे तुमच्या शरीरातील पाणी साठवण्याची क्षमता कमी होते आणि रक्तदाबात तात्पुरती घट जाणवू शकते.”

  • 4/10

    कालांतराने, चवीच्या बाबतीत तुम्ही अधिक संवेदनशील होता आणि तुम्हाला जाणवते की, पदार्थांची चव वेगळी किंवा अगदी बेचव आहे. शरीरात अजिबात मीठ नसल्यामुळे इलेक्ट्रोलाइटचे संतलून बिघडू शकते, ज्यामुळे स्नायूंच्या कार्यावर परिणाम होतो जसे की, मळमळ, उलट्या, चक्कर येऊ शकते आणि संपूर्ण शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते.

  • 5/10

    बोस यांनी सांगितले,” आहारातून संपूर्ण मीठाचे सेवन बंद करणे विसराच पण शरीरातील थोडे जरी मीठ कमी झाले तरी एखाद्याला कोमा, शॉक किंवा गंभीर स्थितीमध्ये मृत्यू होण्याची धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच इतर घटकांद्वारे आवश्यक खनिजांचे संतुलित सेवन करणे आणि आहारातील महत्त्वपूर्ण बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

  • 6/10

    आपल्या शरीराला दररोज ५ ग्रॅम म्हणजे सामान्य व्यक्तीसाठी १ चमचे मीठ आवश्यक असते. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला डायलेटेड कार्डिओमायोपॅथी सारख्या मूत्रपिंड, यकृत किंवा हृदयाशी संबंधित समस्या होत नाहीत, तोपर्यंत आपल्या दैनंदिन आहारात मीठाचे सेवन कमी करू नये.”

  • 7/10

    या मतावर सहमती दर्शवताना मीरा रोड येथील नेफ्रोलॉजिस्ट सल्लागार आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन, पोषणतज्ञ, डॉ. पुनित भुवनिया यांनी सांगितले , शरीरात मीठाच्या कमतरतेमुळे शॉक, कोमा आणि गंभीर स्थितीमध्ये मृत्यूस कारणीभूत ठरू शकते. आपल्या जेवणात आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ असल्याने, मीठाच्या कमतरमुळे शरीरावर तितका परिणाम होत नाही.

  • 8/10

    जे प्रौढ व्यक्ती दररोज ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ वापरतात, त्यांचा रक्तदाब कमी असतो आणि त्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी असतो. मिठाचे सेवन कमी करण्याचा प्राथमिक फायदा म्हणजे उच्च रक्तदाब कमी करणे.

  • 9/10

    ”डॉक्टरांनी विशेष सल्ला दिल्याशिवाय एका महिन्यासाठी मीठ पूर्णपणे सोडून देण्याची शिफारसWhat Happens To The Body When You Give Up Salt For A Month केली जात नाही. “अति मीठ सेवनाने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, परंतु आहारातून मीठ पूर्णपणे काढून टाकल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडू शकते आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

  • 10/10

    सोडियम हे विविध शारीरिक कार्यांसाठी आवश्यक असलेले एक आवश्यक खनिज आहे. पुरेश्या प्रमाणात मीठ वापरण्याची आणि आरोग्यदायी सोडियमचे पर्याय निवडण्याची शिफारस केली जाते, जसे की समुद्री मीठ(sea salt), हिमालयीन गुलाबी मीठ (Himalayan pink salt) किंवा संपूर्ण पदार्थांमध्ये आढळणारे नैसर्गिक क्षार” असे बोस यांनी सांगितले. ( सर्व फोटो सौजन्य -फ्रिपीक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefitsहेल्दी फूडHealthy Foodहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: What happens to the body when you give up salt for a month snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.