-
अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहापासूनच होते. चहा घेतलं की शरीराचा थकवा दूर होतो. अशीच अनेकांची मानसिकता आहे.
-
चहा ही एक सवय आहे जी बऱ्याच लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.
-
तुम्हीही चहाचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
-
तुम्ही रोज दुधाचा चहा पिता तेव्हा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो, याचा कधी विचार केला आहे का?
-
हंग्री कोआला येथील वरिष्ठ पोषणतज्ज्ञ इप्सिता चक्रवर्ती यांनी याबाबत माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
-
दररोज दुधाचा चहा प्यायल्याने दुधात असलेल्या कॅल्शियममुळे तुमची हाडे थोडी मजबूत होऊ शकतात.
-
चहा रोज सेवन केल्यावर ते तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करण्यात मदत करू शकते. पण, जास्त प्रमाणात कॅफिनमुळे चिंता, अस्वस्थता आणि झोप लागणे कठीण होऊ शकते.
-
जास्त प्रमाणातील चहाच्या संयुगांच्या सेवनामुळे तुमच्या शरीराचा लोह शोषून घेण्याच्या क्षमतेमध्ये समस्या निर्माण होऊ शकते.
-
चहामध्ये साखर असल्याने आणि नियमितपणे प्यायल्याने त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो आणि टाइप २ मधुमेहासारख्या आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो.
-
खरंतर, दुधाचा चहा एक स्वादिष्ट आणि आनंददायक पेय असू शकतो, परंतु तुम्ही तो किती वेळा पिता आणि तुम्ही कोणता प्रकार निवडता हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
-
जास्त प्रमाणात दुधाचा चहा पिऊ नका. जेव्हा शक्य असेल तेव्हा साखरेशिवाय किंवा कमी साखरेचा चहा प्या.
-
तुम्हाला पचनाचा त्रास होत असेल तर दुधाचा चहा टाळणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले राहिल. (Photos-freepik)
तुम्ही रोज दुधाचा चहा प्यायल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
तुम्हीही चहाचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही दररोज दुधाचा चहा प्यायल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल, जाणून घ्या…
Web Title: What happens to the body when you drink milk tea every day know from expert pdb