-
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपा महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा आरोप केला. या प्रकरणी आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा झाला.
-
यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांच्यासोबत घडलेल्या काही घटनांची माहिती दिली.
-
तसेच या घटनांना विनयभंग म्हणता येणार नाही, असं स्पष्ट केलं. त्या सोमवारी (१४ नोव्हेंबर) एबीपी माझाशी बोलत होते.
-
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी मुंबईत वाढले आहे. माझे वडील मुख्यमंत्री होते तेव्हा मी ट्रेन आणि बसमधून फिरणारी मुलगी आहे.”
-
“तेव्हा असा प्रवास करणं सामान्य होतं, कौतुकाची गोष्ट म्हणून सांगत नाही,” असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.
-
“मुंबईच्या ट्रेन आणि बसेसमधून लाखोंच्या संख्येने महिला फिरतात, तिथं धक्काबुक्की होत असते,” असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं.
-
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आम्ही मुंबईच्या कणखर मुली आहोत. कोणी मला धक्का मारला, तर आम्ही धक्का देऊ. कारण शेवटी मलाही स्वतःचा बचाव करायचा आहे.”
-
धक्काबुक्कीचे हे प्रकार माझ्यासोबत अनेकदा झालेत – सुप्रिया सुळे
-
मी खासदार असले, तरी शेवटी मी एक महिला आहे. मी जेव्हा ट्रेनमध्ये बसली, कार्यक्रमाला गेली तेव्हा असे प्रकार घडले – सुप्रिया सुळे
-
परवा भारत जोडोत झालं. उत्साही कार्यकर्ते असतात तेव्हा असं होतंच – सुप्रिया सुळे
-
मी भारत जोडोत असं म्हटलं तर ते योग्य नाही. मला माहितीच होतं की तिथं गर्दी आहे – सुप्रिया सुळे
-
तिथं ती मुलं हात ओढत होती. म्हणून ते माझा विनयभंग करायला आले नव्हते. ते त्यांचं प्रेम होतं – सुप्रिया सुळे
-
कधीतरी गैरसमजातून अशा गोष्टी होतात. अशावेळी वाईट वाटलं म्हणून कोणी कोर्टात जात नाही – सुप्रिया सुळे
-
महाराष्ट्रात बंदुकी घेऊन महिलांना शिव्या घालतात. त्यावर आम्ही विनयभंगाची केस करत नाही – सुप्रिया सुळे
-
मी म्हटलं जाऊ दे चुकी झाली, आपली संस्कृती नाही म्हणून दुसरा रस्ता घेऊन पुढे चालतो – सुप्रिया सुळे
-
माझ्या आईने माझ्यावर जे संस्कार केले त्या चौकटीत मी वागण्याचा प्रयत्न करते – सुप्रिया सुळे
-
माझ्या आईने मला एक गोष्ट शिकवली आहे की, गर्दीत गेल्यावर धक्का खायची वेळ आली, तर बाजूला उभी राहा – सुप्रिया सुळे
-
दोन मिनिटं उशीर झाला तरी चालेल, असं मला माझ्या आईने शिकवलं – सुप्रिया सुळे
Photos : “भारत जोडोमध्ये मुलं माझा हात ओढत होती म्हणून…”, सुप्रिया सुळेंनी सांगितल्या स्वतःसोबत घडलेल्या ‘त्या’ घटना
सुप्रिया सुळेंनी जितेंद्र आव्हाडांवरील विनयभंगाच्या आरोपावर प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांच्यासोबत घडलेल्या काही घटनांची माहिती दिली.
Web Title: Supriya sule tell incidence happened with her in bharat jodo yatra amid allegation of molestation on jitendra awhad pbs