-
“छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा कधी माफी मागितली. हे आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात जाहीर केलं पाहिजे.”(सर्व फोटो-संग्रहित)
-
“आता हे जोडे तुम्ही कोणाला मारणार आहात? भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याला मारणार आहात की राज्यपालांना मारणार आहात?”
-
“छत्रपतींनी जर माफी मागितली तर मग पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येऊन शिवरायांचा जयजयकार का करतात?”
-
“भारतीय नौदलाला त्यांनी जे काय नवीन बोधचिन्ह दिलय, शिवाजी महाराजांच्या नौसेनेचं ते कशासाठी दिलं?”
-
“औरंगजेबाच्या आणि अफजलखानाच्या कबरी तोडण्याचे नाटकं कशासाठी करता आहात?”
-
“स्वाभिमान म्हणत भाजपाबरोबर गेले ना, मग आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? ”
-
“राज्यपाल आणि भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर शिवाजी महाराजांचा अपमान करून ७२ तास झाले. तरीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि त्यांचे ४० लोक यावर साधा निषेधही करू शकले नाहीत. इतके तुम्ही घाबरता आहात? ”
-
“शिवाजी महाराजांच्या या अपमानानंतर तुम्ही या सरकारमधून राजीनामा दिला पाहिजे होता, कारण भाजपाने शिवाजी महाराजांचा केलेला हा अपमान आहे.”
-
“वीर सावरकर हे असे एकमेव महापुरुष होते, ज्यांनी त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांची आरती लिहिली. शिवाजी महाराज हे त्यांचे प्रेरणास्थान होते, गुरु होते आणि अशा शिवाजी महाराजांचा अपमान सुद्धा आपण सहन करता आहात.”
-
“आपल्याला सावरकरांवर बोलण्याचा सुद्धा हक्क नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने इथे बोलण्याचा अधिकार नाही.”
-
“मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात आधी भाजपाचा निषेध केला पाहिजे, धिक्कार केला पाहिजे आणि राज्यपालांना हटवण्याची मागणी महाराष्ट्र सरकारकडून अधिकृतपणे यायला पाहिजे.”
-
“नाहीतर जोडे काय असतात आणि जोडे कसे मारले जातात हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही.”
PHOTOS : छत्रपती शिवरायांबद्दल राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदींनी केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत आक्रमक, म्हणाले…
जाणून घ्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर टीका करताना नेमकं काय म्हणाले आहेत.
Web Title: Photos after governor koshyari and sudhanshu trivedis statement about chhatrapati shivaji maharaj sanjay raut aggressive msr