-
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली.
-
यानंतर प्रकाश आंबेडकरांनी युतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते सोमवारी (२३ जानेवारी) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
-
यावेळी प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांच्या युतीवरील वक्तव्यापासून मोदींच्या राजकारणापर्यंत अनेक विषयांवर भाष्य केलं. त्याचा हा आढावा…
-
मी शरद पवार यांची प्रतिक्रिया वाचली आहे. ही प्रतिक्रिया नवीन नाही – प्रकाश आंबेडकर
-
आमच्या दोघांचं भांडण फार जुनं आहे – प्रकाश आंबेडकर
-
हे शेतातलं भांडण नाही, नेतृत्वातील भांडण आहे, दिशेचं भांडण आहे – प्रकाश आंबेडकर
-
ते आमच्याबरोबर येतील अशी आशा मी बाळगतो. कारण या लढ्याकडे मी वेगळ्या दृष्टीने बघतो – प्रकाश आंबेडकर
-
नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले आणि चंद्रशेखर गेले तेव्हा मी खासदार झालो – प्रकाश आंबेडकर
-
आम्ही पहिला आवाज तेव्हाचे टेलिकॉम मंत्री यांच्याविरोधात उठवला. १५ दिवसांनी सभागृह बंद केलं – प्रकाश आंबेडकर
-
नरसिंहराव आणि आमचे चांगले संबंध होते. त्यांनी महिनाभरानंतर बोलावून घेतलं आणि विचारलं की, तुम्ही काय केलं? – प्रकाश आंबेडकर
-
त्यावर आम्ही सभागृह बंद केलं, त्यानंतर तुम्ही पुढे काय केलं असं सांगण्याची मागणी केली – प्रकाश आंबेडकर
-
नरसिंहरावांनी संध्याकाळी आम्हाला पुन्हा बोलावून सांगितलं की, तुम्ही असंच केलं तर देशातील राजकीय नेतृत्व संपेल – प्रकाश आंबेडकर
-
आज दुर्दैवाने ईडीच्या माध्यमातून मोदी सरकार राजकीय नेतृत्व संपवण्याचं काम करत आहे – प्रकाश आंबेडकर
-
एखाद्या नेत्याने खरंच पैसे खाल्ले असेल तर त्याच्यावर जरूर कारवाई करा आणि न्यायालयात नेऊन तुरुंगात टाका – प्रकाश आंबेडकर
-
मात्र, न्यायालयात न्यायचं नाही, तुरुंगात टाकायचं नाही, केवळ नेतृत्वाचं प्रतिमाहनन करायचं काम सुरू आहे – प्रकाश आंबेडकर
-
कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही – प्रकाश आंबेडकर
-
एक दिवस प्रत्येकाचा अंत होणार आहे. तसाच एक दिवस नरेंद्र मोदींचाही अंत होणार आहे – प्रकाश आंबेडकर
-
या निमित्ताने निवडणुकांमध्ये एक बदलाचं राजकारण सुरू झालं आहे – प्रकाश आंबेडकर
-
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सोबत येतील अशी अपेक्षा आहे – प्रकाश आंबेडकर (छायाचित्र – वंचित बहुजन आघाडी सोशल मीडिया)
Photos : शरद पवारांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर ते मोदींचा अंत, ठाकरे गट-वंचितची युती करताना प्रकाश आंबेडकरांची महत्त्वाची विधानं
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांच्या युतीवरील वक्तव्यापासून मोदींच्या राजकारणापर्यंत अनेक विषयांवर भाष्य केलं. त्याचा हा आढावा…
Web Title: Important statements of prakash ambedkar on sharad pawar narendra modi shivsena vba alliance uddhav thackeray pbs