• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. important statements of pm narendra modi speech in rajyasabha sansad parliament sonia gandhi sharad pawar pbs

गांधी कुटुंब नेहरू आडनाव का लावत नाही ते शरद पवार आदरणीय, पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले? वाचा…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत बोलताना विरोधकांवर सडकून टीका केली. गांधी कुटुंबावर हल्लाबोल केला, मात्र, शरद पवारांचं कौतुक केलं. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

February 9, 2023 22:30 IST
Follow Us
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत बोलताना विरोधकांवर सडकून टीका केली.
    1/27

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत बोलताना विरोधकांवर सडकून टीका केली.

  • 2/27

    शेरोशायरीचा वापर करत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं.

  • 3/27

    गांधी कुटुंबावर हल्लाबोल केला, मात्र, शरद पवारांचं कौतुक केलं.

  • 4/27

    मोदी या भाषणात नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

  • 5/27

    मी इतकंच सांगेन की, ‘किचड उसके पास था, मेरे पास गुलाल, जो भी जिसके पास था उसने दिया उछाल…’. तुम्ही जितका चिखल उडवाल तेवढं कमळ फुलेल – नरेंद्र मोदी

  • 6/27

    त्यामुळे कमळ फुलवण्यात विरोधकांचं जे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान आहे त्यासाठी मी त्यांचेही आभार मानतो – नरेंद्र मोदी

  • 7/27

    विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, आम्ही ६० वर्षात भक्कम पाया बनवला. आता त्यांची तक्रार होती की, पाया आम्ही तयार केला आणि श्रेय मोदी घेत आहे – नरेंद्र मोदी

  • 8/27

    मात्र, २०१४ मध्ये सत्तेत आल्यावर मी गोष्टी बारकाईने पाहिल्या. तेव्हा लक्षात आलं की, ६० वर्षे काँग्रेस परिवाराने केवळ खड्डेच खड्डे निर्माण केले होते – नरेंद्र मोदी

  • 9/27

    गांधी परिवाराचा हेतू चांगलाही असेल. मी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीये. मात्र, त्यांनी खड्डेच खड्डे निर्माण केले – नरेंद्र मोदी

  • 10/27

    कोणत्याही कार्यक्रमात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचा उल्लेख झाला नाहीतर काहींच्या डोक्यावरील केसं उभं राहतात – नरेंद्र मोदी

  • 11/27

    आमच्याकडून कधीतरी चुकून नाव राहिलं गेलं असेल. ते आम्ही ठिक करु शकतो. कारण, ते देशाचे पहिले पंतप्रधान होते – नरेंद्र मोदी

  • 12/27

    मात्र, त्यांच्या वारसातील कोणत्याही व्यक्तीला नेहरूंचं आडनाव लावण्यास का भिती वाटते. का नेहरुंचं आडनाव लावण्यास लाज वाटते – नरेंद्र मोदी

  • 13/27

    काही लोकांचा व्यवहार हा निराशजनक आहे. या सदस्यांना मी सांगू इच्छितो की, ‘जेवढा तुम्ही चिखल उडवणार, तेवढं कमळ उगवणार’. आमच्या यशात तुमचं योगदान विसरणार नाही – नरेंद्र मोदी

  • 14/27

    आमच्यावर राज्यांना त्रास देत असल्याचा आरोप करण्यात येतो. पण, विरोधी पक्षात बसलेल्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर कसा केला, याचा सर्वांना दाखला देतो – नरेंद्र मोदी

  • 15/27

    इतिहास काढून पाहा कोणता पक्षा होता? आणि कोण सत्तेत बसलं होतं? ज्यांनी कलम ३५६ चा सर्वात जास्त दुरुपयोग केला – नरेंद्र मोदी

  • 16/27

    काँग्रेसने ९० वेळा निवडून आलेली सरकारं पाडली, तर पंतप्रधान इंदिरा गांधींनी ५० वेळा सरकार पाडलं – नरेंद्र मोदी

  • 17/27

    केरळमध्ये डाव्या विचारसारणीचे सरकार निवडून आलं होतं. ते पंडित जवाहरलाल नेहरुंना आवडलं नाही; आणि सरकार पाडलं – नरेंद्र मोदी

  • 18/27

    डाव्या पक्षांनी आज ते तिथे उभे आहात, पण तुमच्यासोबत काय झालं होतं, ते आठवा… – नरेंद्र मोदी

  • 19/27

    तामिळनाडूमध्ये एमजीआर आणि करुणानिधी यांच्यासारख्या दिग्गजांचं सरकारही याच काँग्रेसवाल्यांनी बरखास्त केलं होतं – नरेंद्र मोदी

  • 20/27

    एमजीआर यांचा आत्मा वरून पाहत असेल की तुम्ही कुणाच्या बाजुने उभे आहात – नरेंद्र मोदी

  • 21/27

    या सभागृहाचे वरिष्ठ सदस्य तिथे मागे बसले आहेत. मी त्यांना नेहमी एक आदरणीय नेता मानतो, त्यांचं नाव श्रीमान शरद पवार – नरेंद्र मोदी

  • 22/27

    १९८० मध्ये शरद पवारांचं वय ३५ ते ४० वर्षे होतं. एक नवखा मुख्यमंत्री महाराष्ट्राची सेवा करायला निघाला होता. पण त्यांच्या सरकारला काँग्रेसने पाडलं – नरेंद्र मोदी

  • 23/27

    आज तेही काँग्रेसच्या बाजुने आहेत. प्रत्येक प्रादेशिक नेत्यांना काँग्रेसने त्रास दिला आहे – नरेंद्र मोदी

  • 24/27

    एनटीआर यांच्यासोबत काय झालं? ते जेव्हा उपचारासाठी अमेरिकेत गेले, त्याचवेळी काँग्रेसने एनटीआरचं सरकार पाडलं, ही काँग्रेसची राजनीती आहे – नरेंद्र मोदी

  • 25/27

    मागील तीन ते चार वर्षात साधारण ११ कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचलेले आहे – नरेंद्र मोदी

  • 26/27

    सामान्य माणसाच्या प्रगतीसाठी आम्ही जनधन योजनेद्वारे अनेक लोकांचे बँक खाते उघढले – नरेंद्र मोदी

  • 27/27

    मागील ९ वर्षात ४८ कोटी जनधन बँक खाते उघडण्यात आले – नरेंद्र मोदी (सर्व फोटो संग्रहित)

TOPICS
काँग्रेसCongressनरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPराहुल गांधीRahul Gandhiशरद पवारSharad Pawarसोनिया गांधीSonia Gandhi

Web Title: Important statements of pm narendra modi speech in rajyasabha sansad parliament sonia gandhi sharad pawar pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.