-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत केलेली एक टिप्पणी वादात अडकली आहे. (Photo: Amit Shah/X)
-
शाहांचे वक्तव्य
अमित शाह राज्यसभेत भाषण करताना म्हणाले, “आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेणे ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळेल.” (Photo: Amit Shah/X) -
या विधानाआधी अमित शाह म्हणाले होते की, “आंबेडकरांचे नाव तुम्ही १०० वेळा जरी घेतले, तरी तुम्हाला आंबेडकरांविषयी काय वाटते, हे मी सांगतो.” (Photo: Amit Shah/X)
-
दरम्यान, काँग्रेसने या टिप्पणीवर आक्षेप घेतला असून अमित शाह यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. (Photo: Congress/X)
-
तर राज्यातही अमित शाहांच्या वक्तव्यानंतर घडामोडी घडत आहेत, आज नागपूर विधानभवन परिसरात विरोधकांचे आंदोलन पाहायला मिळाले आहे. (Photo: ShivsenaUBT/Socia media)
-
हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानभवन परिसरात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. (Photo: ShivsenaUBT/Socia media)
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या अमित शाहांच्या वक्तव्याचा विरोधकांनी निषेध केला. (Photo: ShivsenaUBT/Socia media)
-
नागपूरच्या संविधान चौकातून आंदोलनाला सुरुवात झाली. महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाचे नेते या आंदोलनात सहभागी झाल्याचे पहायला मिळाले. (Photo: ShivsenaUBT/Socia media)
-
यावेळी विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (Photo: ShivsenaUBT/Socia media)
Photos : अमित शाहांच्या आंबेडकरांवरील वक्तव्याविरोधात मविआ आक्रमक; नागपूरात केले आंदोलन, पाहा फोटो
हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानभवन परिसरात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
Web Title: Mahavikas aghadi protest in nagpur against union home minister amit shah over his statement on babasaheb ambedkar see photos spl