• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • पाऊस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. nephew of gopinath munde minister dhananjay munde resignation know about his political journey spl

अखेर धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा, ‘असा’ होता इथवरचा प्रवास…

Dhananjay Munde resignation : सुरुवातीला ते भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडीचे प्रमुख होते.

Updated: March 4, 2025 12:06 IST
Follow Us
  • dhananjay munde resignation, dhananjay munde political career, biography
    1/16

    मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून होत असलेल्या विविध आरोपांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.

  • 2/16

    अखेर आज त्यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

  • 3/16

    महायुती सरकारच्या नव्या टर्मचे पहिलेच विधानसभा अधिवेशन सुरू असताना हा राजीनामा आला आहे.

  • 4/16

    दरम्यान, धनंजय मुंडे हे सध्या अन्न, नागरी पुरवठा मंत्री म्हणून कार्यरत होते, जाणून घेऊयात त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा राहिलाय?

  • 5/16

    धनंजय पंडितराव मुंडे हे दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत.

  • 6/16

    वैयक्तिक जीवन आणि शिक्षण
    मुंडे यांचा जन्म १५ जुलै १९७५ला नाथ्रा, परळी वैजनाथ, बीड येथे झाला. मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल परळी वैजनाथ येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण सिम्बॉयसीस कॉलेज पुणे येथून झाले आहे. त्यांनी बॅचलर ऑफ सोशल लॉ मधून आपली पदवी संपादन केली आहे.

  • 7/16

    १९९५ च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले.

  • 8/16

    सुरुवातीला ते भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडीचे प्रमुख होते.

  • 9/16

    त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले आहे. २०१२ मध्ये धनंजय मुंडे यांनी भाजपाच्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. वडील पंडितराव मुंडे यांच्यासह त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

  • 10/16

    २०१४ विधानसभा निवडणुकीत बहिण पंकजा मुंडे यांना परळीत आव्हान दिलं पण पराभव
    महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते
    २२ डिसेंबर २०१४ – २४ ऑक्टोबर २०१९

  • 11/16

    पहिला विजय
     २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पंकजा मुंडे यांना परळीतून पराभूत केलं.
    महाराष्ट्र सरकारच्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री
    ९ जानेवारी २०२० – २९ जून २०२२

  • 12/16

    महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री
    ३० डिसेंबर २०१९ – २९ जून २०२२
    मंत्री
    सामाजिक न्याय विशेष सहाय्य

  • 13/16

    महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री
    खाते- कृषी
    २ जुलै २०२३ – २६ नोव्हेंबर २०२४

  • 14/16

    २०२४ मध्ये पुन्हा प्रचंड मतांनी वियजी
    महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री
    १५ डिसेंबर २०२४ – ४ मार्च २०२५ रोजी
    मंत्री
    अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

  • 15/16

    आज रोजी ४ मार्च २०२५ मंत्रीपदावरून पायउतार. दरम्यान, धनंजय मुंडे अनेकदा वैयक्तिक वादातही सापडले आहेत. २०२१ मध्ये एका तरुणीने त्यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ही तक्रार मागे घेण्यात आली. धनंजय मुंडे यांच्यावर त्यांची दुसरी पत्नी करुणा मुंडे यांनीही अनेक आरोप केले आहेत. 

  • 16/16

    (सर्व फोटो साभार- धनंजय मुंडे सोशल मीडिया) हेही पाहा- कोण होती काँग्रेस कार्यकर्ता हिमानी नरवाल? सूटकेसमध्ये मिळाला मृतदेह; मुलीच्या हत्येनंतर आई काय म्हणाली?

TOPICS
अजित पवारAjit Pawarगोपीनाथ मुंडेGopinath Mundeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisधनंजय मुंडेDhananjay Mundeपंकजा मुंडेPankaja MundeबीडBeedमराठी बातम्याMarathi News

Web Title: Nephew of gopinath munde minister dhananjay munde resignation know about his political journey spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.