-
सध्या राज्यामध्ये राज आणि उद्धव हे दोन भाऊ एकत्र यणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. उद्या ५ जुलै रोजी विजयाचा जल्लोष मेळावाही होणार आहे. (संग्रहित फोटो)
-
यासाठी दोन्ही पक्ष शिवसेना व मनसेचे कार्यकर्ते आता एकत्र येताना पाहायला मिळत आहे. (संग्रहित फोटो)
-
पहिलीपासून हिंदी किंवा इतर भाषा शिकवण्याच्या शासनाच्या जीआरविरुद्ध दोन्ही पक्षांनी विरोधाची भूमिका घेतली होती. मराठी जनांच्या भव्य मोर्चाचे आयोजनही करण्यात आले होते. (संग्रहित फोटो)
-
त्यानंतर सरकारने हा जीआर रद्द केला आहे. परंतू मराठीच्या मुद्द्यावरून उद्या विजयाचा जल्लोष होणारच अशी भूमिका दोन्ही पक्षांनी घेतली आहे. (संग्रहित फोटो)
-
दरम्यान, एकीकडे दोन्ही ठाकरेंच्या जवळीकतेचा प्रवास सुरू झाला आहे, तर दुसरीकडे महायुतीतील नेते व संयुक्त शिवसेनेत काम केलेले काही ज्येष्ठ नेते विविध प्रतिक्रिया देत आहेत. (संग्रहित फोटो)
-
खासदार नारायण राणेंनंतर आता राज व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदमांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली आहे. (संग्रहित फोटो)
-
काय म्हणाले रामदास कदम?
या मुलाखतीत “राज ठाकरेना जीवे मारण्याचा डाव कोणाचा होता, राज यांच्याबरोबर कणकवलीमध्ये काय घडणार होतं?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. (संग्रहित फोटो) -
घातपाताचा प्लॅन
‘राज ठाकरेंच्या घातपाताचा डाव उद्धव यांनी आखला होता. कणकवलीला जाताना आम्ही वाट बदलली. पोलिसांनी मुंबईत परतण्याचे आवाहन केले होते. यासगळ्याबद्दल राज ठाकरेंना विचारा.”, असा धक्कादायक दावा रामदास कदम यांनी केला आहे. (संग्रहित फोटो) -
राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना निवडून दिले पण उद्धव यांनी हा पथ्य पाळले नाही. तसेच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यात राज ठाकरेंना व्यासपीठावर बसायला जागा दिली नाही. मी उठून त्यांना बसायला जागा दिली होती. त्यांना काय अपमान करायला बोलावलं होतं का?, असाही सवाल रामदास कदम यांनी यावेळी उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं आहे. (संग्रहित फोटो)
“कणकवलीला जाताना…”; उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घातपाताचा डाव आखला होता, रामदास कदमांचं खळबळजनक वक्तव्य
Ramdas kadam on raj thackeray: शिवसेनेचे (शिंदे) नेते रामदास कदम यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा घातपात करण्याचा कट आखला होता, असा दावा रामदास कदमांनी केला आहे.
Web Title: Shivsena leader ramdas kadam said that uddhav thackeray planned to assassinate raj thackeray s ubt mns alliance spl