• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. suryakumar yadav now equalls virat kohli sets this new record after a halfcentury in t20 arg

सूर्यकुमार यादव आता विराटच्या बरोबरीत; टी-२० मधील अर्धशतकानंतर केले ‘हे’ नवीन विक्रम

टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारताने पहिल्या ‘सुपर ८’ सामन्यात अफगाणिस्तानचा ४७ धावांनी पराभव केला. सामन्यामध्ये सूर्यकुमार यादवने १८९.२९ च्या स्ट्राइक रेटने २८ चेंडूंत पाच चौकार व तीन षटकारांच्या मदतीने ५३ धावांची खेळी केली.

June 21, 2024 19:11 IST
Follow Us
    suryakumar-yadav-new-T20-record-equalls-virat-kohli-in-the-list
    गुरुवारी झालेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात भारताने टी-२० विश्वचषकात सलग चौथा विजय नोंदवला. भारताने अफगाणिस्तानचा ४७ धावांनी पराभव करीत सुपर एट फेरीच्या अ गटातील सामना जिंकला.
    भारताने सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत आठ विकेट गमावून १८१ धावा केल्या. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व अर्शदीप सिंग यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करीत प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.
    भारत विरुद्ध अफगाणिस्तान हा सूर्यकुमारचा ६४ वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना होता. सूर्याने आतापर्यंत १५ वेळा प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार जिंकला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हा पुरस्कार सर्वाधिक वेळा जिंकणाऱ्या यादीत त्याने आता विराट कोहलीची बरोबरी केली आहे.
    टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारताने पहिल्या ‘सुपर ८’ सामन्यात अफगाणिस्तानचा ४७ धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघ ‘सुपर ८’च्या अ गटात अव्वल स्थानी पोहोचला आहे. सामन्यामध्ये सूर्यकुमार यादवने १८९.२९ च्या स्ट्राइक रेटने २८ चेंडूंत पाच चौकार व तीन षटकारांच्या मदतीने ५३ धावांची खेळी केली.
    सूर्यकुमारला त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला.
    विराटला १५ वेळा ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार मिळाला आहे. मात्र, विराट त्यासाठी ११३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे; पण सूर्याने फक्त ६४ सामने खेळून विराटशी बरोबरी केली आहे.
    २०२२ च्या टी-२० विश्वचषकात विराट शेवटच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला होता. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी विराटला बांगलादेशविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यात नाबाद ६४ धावांच्या खेळीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार मिळाला होता.
  • 1/10

    सूर्यकुमारबद्दल बोलायचे झाले, तर तो २०२२ टी-२० वर्ल्ड कपपासून २४ सामने खेळला आहे आणि तीन शतके झळकवली आहेत. २०२२ च्या टी-२० विश्वचषकानंतर या फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी सूर्या सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने २४ सामन्यांत ५१ च्या सरासरीने आणि १५६.२९ च्या स्ट्राईक रेटने ९६९ धावा केल्या आहेत. सूर्याने तीन शतकांव्यतिरिक्त सात अर्धशतकेही केली आहेत. नाबाद ११२ ही सूर्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

  • भारत ‘सुपर ८’मधील आपला पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध २२ जून रोजी अँटिग्वा येथे खेळणार आहे. त्यानंतर २४ जूनला सेंट लुसिया येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना होणार आहे.
    (सर्व फोटो : इंडियन क्रिकेट टीम अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
TOPICS
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ICC T20 World Cup 2024क्रीडाSportsटी-२० वर्ल्ड कप २०२४T20 World Cup 2024टीम इंडियाTeam Indiaमराठी बातम्याMarathi Newsविराट कोहलीVirat Kohliसूर्यकुमार यादवSuryakumar Yadav

Web Title: Suryakumar yadav now equalls virat kohli sets this new record after a halfcentury in t20 arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.